दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23व्या सामन्यासाठी आमने-सामने आहेत. मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे हा सामना पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाची धुरा पुन्हा एकदा एडेन मार्करम (Aiden Markram) याच्या खांद्यावर आहे. टेम्बा बावुमा (Temba Bavuma) सामन्यात खेळत नाहीये. लुन्गी एंगिडी याच्या जागी लिजाद विलियम्स याची संघात एन्ट्री झाली आहे. तसेच, बांगलादेश संघात एक बदल आहे. तौहीद हृदोय बाहेर पडला असून त्याच्या जागी कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) संघात परतला आहे.
South Africa have won the toss and they've decided to bat first.
No Temba Bavuma, Shakib Al Hasan is back for Bangladesh. pic.twitter.com/vP6mstmHQO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 24, 2023
स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातील 3 सामन्यात विजय, तर 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 102 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांनी विजय मिळवलेला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना नेदरलँड्स संघाने 38 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, चौथ्या सामन्यात पुनरागमन करत त्यांनी इंग्लंडला 229 धावांनी पराभवाची धूळ चारली होती. अशात या पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरीकडे, बांगलादेश (Bangladesh) संघाने स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी फक्त 1 सामना जिंकला आहे. तसेच, उर्वरित 3 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, पुढील तिन्ही सामन्यात त्यांना पराभवच पत्करावा लागला. त्यात ते इंग्लंडविरुद्ध 137 धावांनी, न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने आणि भारताविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत झाले. (South Africa have won the toss and have opted to bat against bangladesh)
विश्वचषकातील 23व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्कराम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विलियम्स
बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल होसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहिदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला शोएब अख्तर; म्हणाला, ‘बाबरमध्ये स्टॅमिना…’
वानखेडेवरील SA vs BAN सामन्यात खेळपट्टी कुणाची देणार साथ? वाचा हवामान ते आकडेवारीविषयी सर्वकाही