दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यजमान दक्षिण आफ्रिकेकडून डाव आणि 32 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत भारतीय संघापेक्षा सरस असल्याचे सिद्ध झाले. आफ्रिकन गोलंदाजांनी या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताला दुसऱ्या डावात केवळ 131 धावात गुंडाळले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी हा सामना कर्णधारपदासह फलंदाजीच्या बाबतीतही खूपच खराब होता. कागिसो रबाडा याने त्याला दोन्ही डावात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने पहिल्या डावात 5 धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्यविरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा कसोटी विक्रम अगदी सामान्य होता. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 11 डावात रोहितला सात वेळा बाद केले आहे. माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही याबाबत प्रतिक्रिया दिली असून रबाडासाठी रोहितला बाद करणे खूप सोपे असल्याचे मत व्यक्त केले.
आपल्या यूट्यूब चॅनलवर कागिसो रबाडाचे कौतुक करताना आकाश चोप्रा म्हणाला, “कागिसो रबाडाच्या मागील पॅकेटमध्ये रोहित शर्माचा नंबर असल्याचे दिसते. त्याने त्याला अनेकदा बाद केले आहे. या सामन्यातही त्याने रोहितला बाद केले. पहिल्या डावात रबाडाने रोहितला बाऊन्सरवर बाद केले तर दुसऱ्या डावात चेंडू शानदार होता. दुसऱ्या डावात रबाडाचा चेंडू खेळपट्टीपासून दूर जात असताना ऑफ स्टंपला लागला आणि रोहित शर्माला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही.”
रोहित शर्मा व्यतिरिक्त चोप्रा शुभमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्या फलंदाजीबद्दलही बोलला. तो म्हणाला, “यशस्वी ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू जवळजवळ अशक्यप्राय होता. यानंतर शुभमन गिलने नक्कीच काही चौकार मारले पण तोही बाद झाला. शुभमनला राजपुत्रातून राजा व्हायचे असेल तर त्याला भारताबाहेर चांगली कामगिरी करून धावा कराव्या लागतील.”
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात केवळ अनुभवी फलंदाज विराट कोहली 76 धावांची खेळी करू शकला. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. (South African fast bowler Rabada praised by Indian legend Said He put Rohit in the back pocket)
हेही वाचा
चेन्नई क्विक गन्स कडून राजस्थान वॉरियर्सचा पराभव, रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत पुणेरी वॉरियर्स, केपी इलेव्हन, जीओजी एफसी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश