नवी दिल्ली । इंग्लंडविरुद्दच्या देशांतर्गत कसोटी मालिकेत ३-१ने पराभव झाल्यानंतर फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदावरून विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता बोर्ड सतत संघाच्या नव्या कर्णधारांच्या नावांबद्दल विचार करत आहे.
यानंतर आता दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी सलामीवीर फलंदाज डीन एल्गरने (Dean Elgar) पसंती दर्शविली आहे. तो म्हणाला की, तो कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळण्यास तयार आहे.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचा कर्णधार बनण्याबद्दल एल्गर म्हणाला की, तो कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळण्यास उत्सुक आहे. तसेच जर त्याला ही जबाबदारी सोपविली, तर तो गांभीर्याने कर्णधारपदाची भूमिका बजावेल. विशेष म्हणजे डू प्लेसिसने फेब्रुवारीमध्ये आपल्या कसोटी नेतृत्वाचा राजीनामा दिला होता आणि एक खेळाडू म्हणून संघाकडून खेळणार असल्याचे म्हटले होते.
“कसोटी संघाचे नेतृत्व करणे निश्चितच सोपे नाही. परंंतु मला वाटते की, मी नेतृत्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. यापूर्वीही मी शाळेपासून प्रांतीय पातळीवरील संघ आणि फ्रंचायझी स्तरापर्यंत नेतृत्व केले आहे. मी याचा आनंद लूटला. तसेच जर मला कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारण्याबद्दल विचारले तर मी निश्चितच याबाबतीत गांभीर्याने विचार करेल. कारण हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला (Cricket South Africa) दिलेल्या मुलाखतीत एल्गर म्हणाला.
असे असले तरी डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा केल्या जात होत्या की, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेट संघाचेही नेतृत्व क्विंटन डी कॉकला (Quinton De Kock) सोपवणार आहे. तरी स्वत: बोर्डाने याबाबतीत स्पष्ट केले की, डी कॉकवरील कामाचा ताण अधिक वाढवायचा नाही. त्यामुळे कसोटी सामन्याचे कर्णधारपद इतर खेळाडूला सोपवण्यात येईल.
जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघाला ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत नव्या कसोटी कर्णधाराची घोषणा केलेली नाही. बोर्ड आताही कसोटी कर्णधारपदासाठी खेळाडूचा शोध घेत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘संघसहकाऱ्यांंना वडील हाकलून द्यायचे घराबाहेर; म्हणायचे क्रिकेटमध्ये…’
-विराट कोहलीचा ‘हा’ शॉट जगातील सर्वोत्तम
-किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच