दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ते २-१ने पुढे आहेत. दोन सामने खेळण्याचे बाकी असून त्यातील चौथा सामना राजकोट येथे शुक्रवारी (१७ जून) खेळला जाणार आहे. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यााआधीच पाहुण्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम (Aiden Markram) या दौऱ्यातील एकही सामना न खेळता बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने (सीएसए) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. सीएसने ट्वीट करत म्हटले,”एडन मार्करमला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकतील उर्वरीत दोन टी२० सामन्यातून बाहेर केले आहे. त्याची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्याला मागील एक आठवडा क्वारंटाईन ठेवले होते. तो अंतिम दोन सामन्यात खेळण्यासाठी संघात परतणार नाही.”
मार्करम संघातून बाहेर गेला असला तरी दक्षिण आफ्रिकेसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांचा यष्टीरक्षण-फलंदाज क्विंडन डी कॉक (Quinton De Kock) दुखापतीतून सुधारला असून त्याच्या तंदुरूस्तीवर नजर असणार आहे. सीएसएने ट्वीट करत म्हटले,”यष्टीरक्षण-फलंदाज क्विंडन डी कॉकच्या हाताची दुखापत सुधारली आहे. मेडिकल स्टाफच्या रिपोर्टनुसार तो चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.”
डी कॉकच्या जागी यष्टीरक्षण-फलंदाज हेन्रिच क्लासेन (Heinrich Klaasen) याला संघात घेतले होते. त्याने कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ४६ चेंडूत ८१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्सने जिंकला होता. त्यांचा हा भारताविरुद्ध सलग सातवा विजय ठरला होता. टी२० सामन्यात विजयाची हॅट्ट्रीक करण्याच्या हेतूने उतरल्यावर भारतीय गोलंदाजांनी त्यांची निराशा केली.
विशाखापट्टनम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० (INDvsSA Third T20) सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवला होता. रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वाखालील हा भारताचा पहिला विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच यजमान संघाने मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यात भारतीय सलामीजोडीने तुफानी फलंदाजी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
तिसऱ्या टी२० सामन्यात कशी काय युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीला आली धार? स्वतः सांगितले कारण