भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1ने विजय मिळवला. त्यानंतर आता भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात टक्कर होणार आहे. भारतीय संघाचा हा दौरा येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, मर्यादित षटकांच्या मालिकेतून टेम्बा बावुमा याला विश्रांती दिली आहे. खरं तर, बावुमा हा वनडे संघाचा नियमित कर्णधारही आहे.
मुख्य प्रशिक्षकाचे स्पष्टीकरण
अशात टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याला विश्रांती देण्यावर दक्षिण आफ्रिका संघाचे मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकाराचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर (Rob Walter) यांनी मोठे विधान केले आहे. सोमवारी (दि. 4 डिसेंबर) माध्यमांशी संवाद साधताना वॉल्टर म्हणाले की, “टेम्बाने पूर्ण वर्षे शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत दबाव असतो आणि एक मानसिक प्रभावही पडतो. एका कर्णधाराची चौकशी अधिकच स्पष्ट आहे. टेम्बाला काही काळासाठी विश्रांती देणे आणि कसोटी मालिकेसाठी तयार राहण्यास प्राथमिकता देणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एवंढच नाही, तर आमचे सर्व खेळाडू कसोटी मालिकेसाठी चांगल्या स्थितीत असावे, ही आमची इच्छा आहे.”
पुढे बोलताना प्रशिक्षक म्हणाले की, “टेम्बा बावुमाला विश्रांती देणे एक प्रगतीशील निर्णय वाटू शकतो, पण वास्तवात हा निर्णय घेणे सोपे होते. मी, बावुमा आणि कसोटी प्रशिक्षक शुकरी आम्हा तिघात एकमत झाले होते. आम्ही जास्त विचार केला नाही. कारण, हा निर्णय बावुमा आणि त्याच्या क्रिकेटसाठी योग्य होता.”
खरं तर, दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा याच्यासाठी 2023 हे वर्ष फलंदाजीसाठी चांगले ठरले. मात्र, विश्वचषक 2023 स्पर्धेत त्याला फलंदाजीत खास कमाल करता आली नव्हती. त्याने यादरम्यान फक्त 8 सामने खेळले होते. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त 145 धावा निघाल्या होत्या. अशात बावुमाचे लक्ष आता खराब प्रदर्शनाला मागे सोडत भारताविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली फलंदाजी करण्यावर असेल. (south africas head coach rob walter explains the reason behind skipper temba bavuma being rested in the limited overs series against india)
हेही वाचा-
आफ्रिकन कोचचा डी कॉकविषयी धक्कादायक खुलासा! म्हणाला, ‘वर्ल्डकपनंतर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून…’
सर्वजण उन्हात तळत होते, पण सॅम करनला सुचला उपाय! मागचा पुढचा विचार न करता सनग्लास घालून खेळला