---Advertisement---

BREAKING: दक्षिण विभागाने उंचावली देवधर ट्रॉफी! अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा उडवला धुव्वा

---Advertisement---

दोन वर्षाच्या कालावधीनंतर आयोजित केल्या गेलेल्या देवधर ट्रॉफी या लिस्ट ए स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (3 ऑगस्ट) खेळला गेला. पॉंडेचेरी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा 45 धावांनी पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात सलामीवीर रोहन कन्नुमल याने शानदार आक्रमक शतक झळका व दक्षिण विभागाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

साखळी फेरीत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या दक्षिण विभाग व दुसऱ्या क्रमांकावरील पूर्व विभाग यांच्यातील या सामन्यात दक्षिण विभागाचा कर्णधार मयंक अगरवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याने स्वतः सलामीला येत सार्थ ठरवला. त्याने रोहन कन्नुमल याच्यासह 181 धावांची सलामी दिली. रोहनने 75 चेंडूवर 107 धावा केल्या. तर, मयंकने 63 धावा काढल्या. त्यानंतर एन जगदीशश याने देखील अर्धशतक करून संघाला 328 पर्यंत मजल मारून दिली.

विजयासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पूर्व विभागाची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ 14 धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर सुदीप घरामी व सौरभ तिवारी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या रियान पराग व कुमार कुशाग्र यांनी पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. परागने 65 चेंडूवर 95 व कुमारने 68 धावा केल्या. ते दोघेही बाद झाल्यानंतर इतर फलंदाज संघर्ष करू शकले नाहीत. अखेरीस, दक्षिण विभागाने 45 धावांनी विजयी आपल्या नावे केला.

मागील महिन्यातच दक्षिण विभागाने यावर्षीच्या देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीचा चषक देखील उंचावला होता.

(South Zone Won Deodhar Trophy Kannumal Hits Century)

महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! ‘हे’ कारण देत दिग्गजानेच उमटविली मोहोर
“संजू विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकाचा दावेदार”, दिग्गजाने दिली पसंती 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---