बहुचर्चित ‘द हंड्रेड’ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (21 ऑगस्ट) लंडनच्या लॉर्ड्स येथे पार पडला. पॉल स्टर्लिंगचे अर्धशतक आणि रॉस व्हाइटलीच्या उपयुक्त खेळीमुळे सदर्न ब्रेव्हने बर्मिंघम फीनिक्सला नमवत द हंड्रेडचा पहिला हंगाम आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजी करताना सदर्न ब्रेव्हने 100 चेंडूंमध्ये 5 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला उतरलेल्या बर्मिंघम फिनिक्सचा संघ 5 विकेट्स गमावून 136 धावाच करू शकला आणि संघाला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले
सदर्न ब्रेव्हच्या 169 धावांचा पाठलाग करताना बर्मिंघम फिनिक्सची या स्पर्धेतील सर्वात वाईट सुरुवात झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर सलामीवीर डेव्हिड बेडिंगहॅम आणि विल स्मिड अनुक्रमे 0 आणि 2 धावांवर बाद झाले. कर्णधार मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यातील भागीदारीने संघाला थोड्या चांगल्या स्थितीत आणले. ख्रिस बेंजामिन (नाबाद 23 धावा) आणि बेनी हॉवेल (नाबाद 20 धावा) यांनी शेवटच्या टप्प्यात धावा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
तत्पूर्वी, सदर्न ब्रेव्ह संघाकडून सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि रॉस व्हाईटली यांनी अंतिम सामन्यात तुफान फटकेबाजी करत सदर्न ब्रेव्ह्सला 5 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. पॉल स्टर्लिंगने 36 चेंडूत 61 धावा केल्या. रॉस व्हाईटलीने 19 चेंडूत 44 धावा केल्या. अलेक्स डेव्हिस (27 धावा) आणि टीम डेविड (15 धावा) यांनी छोटेखानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मिल्नेने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 20 पैकी 14 चेंडू निर्धाव टाकले आणि 2 बळीही घेतले.
????️ CHAMPIONS!#TheHundred pic.twitter.com/4SScO9CHYI
— The Hundred (@thehundred) August 21, 2021
यापूर्वी लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या द हंड्रेड महिला अंतिम सामन्यामध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्सने सदर्न ब्रेव्हचा 48 धावांनी पराभव करत जेतेपद काबीज केले. प्रथम फलंदाजी करताना ओव्हल इनविन्सिबल्सने शंभर चेंडूत 6 गडी गमावून 121 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, सदर्न ब्रेव्हचा संपूर्ण संघ 73 धावांवर गुंडाळला गेला.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीचे हेड कोच सायमन यांचा अचानक राजीनामा, आता ‘हा’ दिग्गज असेल नवा प्रशिक्षक
हेडिंग्लेवर विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड
‘माही मार रहा है’! सरावादरम्यान धोनीने मारले एक से बढकर एक षटकार; पाहा व्हिडिओ