पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत पीवायसी 1, पीवायसी 2 या संघांनी अनुक्रमे पीवायसी3 व टेनिसनट्स संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हिमांशू गोसावी/प्रशांत गोसावी, योगेश पंतसचिव/अमित लाटे, हिमांशू गोसावी/रोहित सूर्यवंशी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी2 संघाने टेनिसनट्स संघांचा 21-13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात पीवायसी 1 संघाने पीवायसी3 संघाचा 24-07 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. पीवायसी 1 संघाकडून ऋतू कुलकर्णी/डॉ.अभय जमेनिस, जयंत कढे/परज नाटेकर, केदार शहा/अनुप मिंडा, अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ यांनी सुरेख कामगिरी बजावली.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत पीवायसी 3 संघाने टेनिस नट्स संघाचा 19-18 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी 2 वि.वि.टेनिसनट्स 21-13(100अधिक गट: हिमांशू गोसावी/प्रशांत गोसावी वि.वि.श्रीशाह भट/सी कुमार 6-0; 90अधिक गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे वि.वि.अमित किंडो/सुधीर पिसाळ 6-2; खुला गट: हिमांशू गोसावी/रोहित शिंदे वि.वि.रवी कोठारी/नितीन सावंत 6-5(2); खुला गट: रोहन दामले/अमोघ बेहेरे पराभूत वि.अंकित कापसे/दीपक पाटील 3-6);
पीवायसी 1 वि.वि.पीवायसी 3 24-07(100अधिक गट: ऋतू कुलकर्णी/डॉ.अभय जमेनिस वि.वि.डॉ.चारुदत्त साठे/अमित नाटेकर 6-0; 90अधिक गट: जयंत कढे/परज नाटेकर वि.वि.राजू कांगो/सारंग पाबळकर 6-3; खुला गट: केदार शहा/अनुप मिंडा वि.वि.सारंग देवी/ध्रुव मेड 6-3; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.श्रवण हार्डीकर/मिहीर दिवेकर 6-1);
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:
पीवायसी 3 वि.वि.टेनिस नट्स 19-18(100अधिक गट: डॉ.चारुदत्त साठे/अमित नाटेकर वि.वि.श्रीशाह भट/सी कुमार 6-3; 90अधिक गट: श्रवण हार्डीकर/हर्षा हळबे पराभूत वि.सुधीर पिसाळ/अमित किंडो 5-6(5); खुला गट: मिहीर दिवेकर/सारंग देवी पराभूत वि.रवी कोठारी/नितीन सावंत 2-6; खुला गट: अमित नाटेकर/ध्रुव मेड वि.वि.अंकित कापसे/दीपक पाटील 6-3).
महत्त्वाच्या बातम्या –
४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताचा सर्वात मोठा संघ जाहीर
Oops Moment: चौकार आडवायला गेलेल्या अनुकूल रॉयची खाली घसरली ट्राऊझर आणि मग…