भारतीय संघाचा ‘प्रिन्स’ म्हणून सध्या शुबमन गिल याला ओळखलं जात आहे. हाच प्रिन्स शुक्रवारी (दि. 08 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. हा शुबमन गिलचा 24वा वाढदिवस आहे. शुबमन सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी श्रीलंकेत भारतीय संघासोबत आहे. पंजाबच्या फजिल्का येथे 8 सप्टेंबर 1999 रोजी जन्मलेल्या शुबमनला बालपणापासूनच क्रिकेटची गोडी होती. त्याने आपल्यावर मेहनत घेत भारतीय संघात जागा निर्माण केली. 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलच्या नावावर आज एकापेक्षा एक विक्रम आहेत. हेच विक्रम आज आपण या लेखातून पाहूयात…
शुबमन गिल रेकॉर्ड्स (Shubman Gill Records)
1. द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू
शुबमन गिल (Shubman Gill) याने 2023च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. तसेच, तो अशी कामगिरी करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला. त्याने हा पराक्रम 23 वर्षे आणि 132 दिवसांच्या वयात केला. यामुळे ईशान किशनचा विक्रमही मोडला गेला. ईशानने 24 वर्षे आणि 154 दिवसात बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकले होते.
2. तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक ठोकणारा युवा खेळाडू
‘प्रिन्स’ शुबमन गिल (Prince Shubman Gill) याच्यासाठी 2023 या वर्षाची सुरुवात शानदार झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठोकले होते. त्यानंतर तो या क्रिकेटच्या सर्व प्रकारात शतक ठोकणारा जगातील सर्वात युवा खेळाडू बनला. त्याने नाबाद 126 धावांची खेळी साकारली होती.
3. टी20त सर्वात युवा शतकवीर
शुबमनने न्यूझीलंडविरुद्ध आपले पहिले टी20 शतक ठोकले होते. त्यामुळे तो या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट प्रकारात शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर आयपीएलमध्येही शतकांची नोंद आहे.
4. सर्वात वेगवान 1500 धावा
कँडी येथे आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत नेपाळ संघाविरुद्धच्या सामन्यात शुबमनने 62 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी साकारली होती. यासोबतच तो वनडेत सर्वात वेगवान 1500 धावा करणारा फलंदाजही बनला. भारतीय संघाला त्याच्याकडून आशिया चषकातील पुढील सामन्यातही अशाच फॉर्मची आशा असेल.
5. आयपीएल 2023 स्पर्धेतील युवा ऑरेंज कॅप विजेता
शुबमन हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप मिळवणारा खेळाडू आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत त्याने 851 धावा चोपत 23 वर्षांच्या वयात ऋतुराज गायकवाड याला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. ऋतुराज 2021मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता. (special story about shubman gill know records achievements team india prince)
हेही वाचाच-
फक्त 10 दिवसच टिकला पाकिस्तानचा नंबर वन! ‘या’ संघाने दिला अनपेक्षित धक्का
“संजू दर्जेदार खेळाडू पण…” विश्वविजेत्याने सांगितले सॅमसनला संधी न मिळण्याचे कारण