हॅन्सी क्रोनिये कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकाने ५३ कसोटी सामन्यात २७ सामने जिंकले आणि ११ कसोटीमध्ये हार मिळाली. तसेच १३८ एकदिवसीय सामन्यांपैकी ९९ सामने जिंकले. क्रोनियेची ओळख ही क्रिकेटविश्वातील महान कर्णधारांमध्ये होत असे. मैदानात नेहमी ते वेगवेगळ्या युक्त्या वापरत असत आणि तडाखेबाज फलंदाजीसाठीसुद्धा कधीही घाबरत नसत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आणि दक्षिण आफ्रिका संघाला एक मजबूत संघ बनवले. परंतु एक अशी घटना घडली ज्याने लोकं त्यांचा तिरस्कार करू लागले.
याच क्रोनिए यांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. तरीही आज त्यांचा खेळाव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे त्यांचे नाव काढले जाते. दक्षिण आफ्रिकाचे हे माजी कर्णधार मॅच फिक्सिंगमुळे बदनाम झाले होते. त्यांचा मृत्यू हा ०१ जून २००२ रोजी विमान अपघातामध्ये झाला होता. हा अपघात मॅच फिक्सिंग आरोपानंतर बरोबर २६ महिन्यांनी झाला होता. आश्चर्याची बाब अशी होती की, मृत्यूच्या २ वर्षांपुर्वीच त्यांनी विमान अपघाताची भविष्यवाणी केली होती. त्यांचा अंत्यसंस्कारात जवळ जवळ २००० लोक आले होते.
क्रोनियेंनी ५३ कसोटी सामने आणि १३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका बजावली होती. १९९६ आणि १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व त्यांनी केले होते. रंगभेदावरून झालेल्या वादानंतर दक्षिण आफ्रिका संघावर बंदी आणण्यात आली. बंदीनंतर दक्षिण आफ्रिका संघाचे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले तेव्हा क्रोनियेंना कर्णधारपद देण्यात आले होते. आपल्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली होती आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूर्वीसारखा मजबूत संघ बनवले होते.
क्रोनिए हे तेच व्यक्ती होते, ज्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला जिंकायला आणि लढायला शिकवले होते. क्रोनिये १९९४ पासुन ते २००० साला पर्यंत एका प्रोतीयाज संघाचा भाग होते. परंतु २००० साली त्यांनी स्वतःवरचे आरोप मान्य केले आणि कबुली दिली की मॅच फिक्सिंगसाठी सट्टाबाजामधून पैसे खाल्ले. या गोष्टीमुळे क्रिकेटजगातील भ्रष्टाचार समोर आला आणि लोकांनी त्यांची निंदा केली.
रात्री ३ वाजता फोन करून गुन्हा कबुल केला
या गोष्टीमध्ये दिल्ली पोलीसांनी पहिलेच उघडकीस आणून दिले होते की, क्रोनिये यांनी फिक्सिंग केली होती. सुरुवातीला क्रोनिये यांनी गुन्हा कबुल केला नव्हता. पण काही दिवसांनंतर त्यांनी स्वतः गुन्हा कबुल केला होता. त्यांनी युनाईटेड क्रिकेट बोर्ड ऑफ साउथ आफ्रिकामधील अली बाकर यांना रात्री ३ वाजता फोन करून कबुली दिली होती. या घटनेनंतर त्यांचे जनजीवन पूर्णपणे अस्त व्यस्त झाले होते. त्यांच्यावर क्रिकेट खेळण्यापासून बंदी घातली गेली आणि कर्णधारपदसुद्धा काढून घेतले गेले होते. त्यानंतर ते जोहान्सबर्गच्या एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागले होते.
अशी आहे त्यांची क्रिकेट कारकीर्द
क्रोनिये यांनी ६८ कसोटी सामने खेळले होते. त्यात ३६.४१ च्या सरासरीने ३७४१ धावा केल्या आणि ४३ बळी सुद्धा काढले होते. तसेच १८८ एकदिवसीय सामन्यात ३८.६४ च्या सरासरीने ५५६५ धावा केल्या होत्या. सोबतच ११४ बळी टिपले होते. २४ वर्षांचे असतानाच त्यांना कर्णधारपद मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंड संघ ठरतोय भारतासाठी घातक, १ वेळा हिसकावलाय विश्वचषक
‘ट्रान्सफर विंडो’ची सुविधा असती, तर ‘या’ भारतीयांनी गाजवली असती परदेशी लीगची मैदाने!
वनडे कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणारे ३ भारतीय, एकाने पदार्पणात केलंय शतक