सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या व्यवस्थापन समीतीने भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सदस्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या निवड समीतीच्या अध्यक्षांच्या मानधनात २० लाख रुपये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी निवड समीतीच्या अध्यक्षांचे मानधन वार्षिक ८० लाख रुपये होते. ते आता १ कोटी होणार आहे.
तर तीन सदस्सीय निवड समीती मधील बाकीच्या दोन सदस्यांच्या मानधनात ३० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी निवड समीती मधील दोन सदस्यांचे मानधन वार्षिक ६० लाख रुपये होते.
सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समीती मध्ये तीन सदस्य आहेत. यामध्ये अध्यक्षपदी एमएसके प्रसाद आहेत. तर देवांग गांधी आणि सरनदीप सिंग हे इतर दोन सदस्य आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट सोबतचा फोटो शेअर करत पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत:लाच केले ट्रोल
–विराट कोहलीचे भारतीय चाहत्यांना भावनिक अावाहन