मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या चाणाक्ष नेतृत्वाचे अनेक जण नेहमीच कौतुक करतात. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंगचा त्याचा सहकारी ड्वेन ब्राव्हो हा देखील धोनीचा नेतृत्वाचा फॅन झाला आहे. डेव्हन ब्राव्हो महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना म्हणाला की, मी 2011 साली चेन्नई सुपर किंग संघासोबत जोडलो गेलो. त्यापूर्वी मी अनेक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळलो पण त्यापैकी एकही धोनीच्या आसपास नाहीत. तो सोबत असला की ड्रेसिंगरूमचे वातावरण पूर्ण बदलून जाते.
गुरुवारी ड्वेन ब्राव्हो एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला की, जर कोणी खेळाडू चेन्नई सुपर किंगच्या संघात आला तर त्याच्या करिअरचे पुनर्जन्म होते. शेन वॉटसन आणि अंबाती रायडू यांना चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात स्थान मिळाले तेव्हा त्यांचं करिअर उंचावलं गेलं. धोनीने कधीच कोणत्या खेळाडूंवर दबाव आणला नाही. तो इतका अनुभवी खेळाडू आहे की नेहमी साऱ्यांची मदत करतो. नव्या खेळाडूंशी तो संवाद साधत असताना त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो. धोनी यशाच्या शिखरावर असताना देखील त्याच्यात कधीही मी पणा किंवा तो सूपरस्टारवाले वर्तन कधीच दिसले नाही.
क्रिकेटचे जाणकार एमएस धोनीचे करिअर संपले असे म्हणत असले तरी ड्वेन ब्राव्होला धोनीमध्ये अजून क्रिकेट शिल्लक असल्याचे वाटते. धोनी स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याने इतर खेळाडूंना देखील हेच सांगितले. ब्राव्होला विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी२० विश्वचषकात धोनी खेळेल. पण 2019 च्या एक दिवसीय विश्वकरंडकातील सेमीफायनलच्या सामन्यानंतर धोनी भारतीय संघाकडून खेळला नाही.