fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे

बिग बॉस या लोकप्रिय टीव्ही रियालीटी शोमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सहभाग घेणार आहे. आजपासून (१६ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या या शोमध्ये श्रीसंत बरोबरच अभिनेत्री नेहा पेंडसेही सहभागी होणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या श्रीसंतवरची बंदी केरळच्या सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१७मध्ये काढली आहे. पण बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे. २०११ला जिंकलेल्या आयसीसी विश्वचषक संघाचा तो भाग होता.

श्रीसंत आता क्रिकेटनंतर अभिनय आणि बॉडीबिल्डींग या क्षेत्रांकडे वळाला आहे. त्याच्या या शोमधील सहभागाचे कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंलरवरून सांगितले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कपमध्ये पहिल्यांदाच ‘सुपर ओव्हरचा’ समावेश

रोनाल्डो, मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारा हा तिसराच फुटबॉलपटू

विराट कोहलीला वगळणे कितपत योग्य? माजी निवड समिती सदस्याचा सवाल

You might also like