आयपीएल 2020 मधील 22 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने किंग्स इलेव्हन पंजाबला 69 धावांच्या फरकाने पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघ 16.5 षटकांत केवळ 132 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातील काही खास आकडेवारीवर आपण नजर टाकू.
• पंजाबविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने मिळवलेला हा 11 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकूण 14 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 4 सामने पंजाबने जिंकले होते आणि हैदराबादने 10 सामने जिंकले होते.
• हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीतील 46 वे अर्धशतक झळकावले. या खेळाडूने आयपीएलमध्ये 4 शतकेही ठोकली आहेत.
• हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोने आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. बेयरस्टोने आयपीएलमध्ये शतकही ठोकले आहे.
• सलामीवीर डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात 160 धावांची मोठी भागीदारी झाली. आयपीएलमधील या दोघांची ही पाचवी शतकीय भागीदारी होती.
• सनरायझर्स हैदराबादच्या आयपीएल कारकीर्दीची ही 23 वी शतकीय भागीदारी होती. या 23 पैकी 18 भागीदारींमध्ये डेविड वॉर्नरचा सहभाग आहे.
• पंजाबच्या मागील सामन्यात प्रतिस्पर्धी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने देखील सलामीला 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. या सामन्यातही हैदराबादने 150 पेक्षा जास्त धावांची सलामीची भागीदारी केली. आयपीएलमध्ये पंजाब हा पहिला संघ ठरला आहे ज्याच्याविरुद्ध सलग 2 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांनी 150 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी केली.
• पंजाबचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 37 चेंडूत 77 धावांची खेळी केली.
• हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने 4 षटकांत केवळ 12 धावा देऊन करून 3 बळी घेतले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 : पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
फिंचला मंकडींगने बाद न करण्याचे कारण आले समोर; स्वत: अश्विनने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ