इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 3 चौथा सामना रविवारी (2 एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. मात्र, हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ, पंच तसेच सामन्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू राहिलेल्या दुर्रानी यांचे रविवारी (2 एप्रिल) वयाच्या 88 व्या वर्षी जामनगर येथे निधन त्यांच्या निधनानंतर त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. रविवारी आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यावेळीही त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली.
.@SunRisers & @rajasthanroyals and the match officials observe silence to pay respects to the late Salim Durani. pic.twitter.com/alTAAhauoK
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
सामन्याच्या सुरुवातीआधी मैदानावर खेळाडूंसह प्रेक्षकांनी देखील एक मिनिट म्हणून पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर, खेळाडू व पंचांनी दंडावर काळी पट्टी बांधत त्यांना आदरांजली अर्पण केली.
दुर्रानी (Salim Durrani) एक आक्रामक डावखुरे फलंदाज आणि डावखुरे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 29 कसोटी सामने खेळले. यामध्ये 25.4 च्या सरासरीने त्यांनी 1202 धावा आणि 75 विकेट्स घेतल्या. यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. सलीम यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 170 सामन्यांमध्ये 8545 धावा आणि 484 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यातील पहिल्या डावाचा विचार केल्यास, राजस्थानने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ही संधी योग्य प्रमाणात साधली. जोस बटलर व यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला 6 षटकात 85 धावांची सलामी दिली. दोघांनी प्रत्येकी 54 धावा केल्या. त्यानंतरच कर्णधार संजू सॅमसननेही अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस हेटमायर याने काही आक्रमक फटके खेळत राजस्थानला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.
(SRHvRR and the match officials observe silence to pay respects to the late Salim Durani)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट