आयपीएलचा तेरावा हंगाम अंतिम टप्पायवर आहे. अंतिम सामन्यातील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबी येथे झाला. या ‘करा वा मरा’ स्थितीच्या असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने मात दिली. त्यामुळे बेंगलोर संघ प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. तर हैदराबाद संघ दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा सामना रंगणार आहे.
एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ७ विकेट्स गमावत १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल हैदरबादने १९.४ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या आणि सामना खिशात घातला.
हैदराबादचा डाव
बेंगलोरच्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा फलंदाज केन विलियम्सनने सर्वाधिक नाबाद ५० धावा केल्या. ४४ चेंडूत प्रत्येकी २ चौकार आणि षटकार लगावत त्याने ही धावसंख्या गाठली. तर मनिष पांडेने २१ चेंडूत २४ धावा आणि जेसन होल्डरने २० चेंडूत नाबाद २४ धावांचे योगदान दिले. कर्णधार डेविड वॉर्नरनेही १७ धावा केल्या.
बेंगलोरकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर ऍडम झम्पा आणि युझवेंद्र चहलने हैदराबादच्या प्रत्येकी १ फलंदाजाला बाद केले.
बेंगलोरचा डाव
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक धावा केल्या. या यष्टीरक्षक फलंदाजाने ४३ चेंडूत ५६ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ऍरॉन फिंचने ३० चेंडूत ३२ धावा केल्या. बेंगलोरच्या उर्वरित फलंदाजांना १०पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना जेसन हल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर टी नटराजननेही २ विकेट्सची कामगिरी केली. तसेच शाहबाज नदीमनेही मोईन अलीची एकमेव विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई हारली परंतू आपला ऋतुराज जिंकला, पुण्यात येताच झाला मोठा सन्मान
‘दीदी याला आता तूच समजावून सांग,’ पंतच्या बहिणीकडे चाहत्याची अजब मागणी
दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा