जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ११वा सामना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडलेला हा सामना हैदराबाद संघाने १५ धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ४ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबाद संघाने या हंगामातील पहिला विजय नोंदवला.
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजीला येत ३१ चेंडूत ३४ धावा केल्या. यात त्याच्या ४ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रिषभ पंतने २८ धावा आणि शिमरॉन हेटमायरने २१ धावा केल्या. उर्वरित कोणत्याही खेळाडूला २० धावाही करता आल्या नाहीत.
हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या. ४ षटकात १४ धावा देत त्याने हा कारनामा केला. तर भुवनेश्वर कुमारनेही २ विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमद आणि टी नटराजन यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या हैदराबाद संघाचे सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. बेयरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर वॉर्नरनेही ३३ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. तर या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियम्सननेही ४१ धावांचे योगदान दिले.
दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडा आणि अमित मिश्राने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२०ने सोडली साथ, नाहीतर गेल्या १२ हंगामात खेळले होते ‘हे’ ५ शिलेदार
आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’
खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…
ट्रेंडिंग लेख-
मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत