---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन

srilanka team
---Advertisement---

भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेनं आपला संघ जाहीर केला आहे. चारिथ असलंकाची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून दिनेश चंडिमलचं दोन वर्षांनंतर टी20 संघात पुनरागमन झालंय. चंडिमलनं नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. याचं बक्षीस त्याला मिळालं. याशिवाय या लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या इतर अनेक खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली असून आता श्रीलंकेनंही आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला. श्रीलंकेच्या संघात फक्त अशाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती.

पथुम निसांका, कुसल परेरा आणि कुसल मेंडिस या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये त्यांनी अनेक स्फोटक खेळी खेळल्या होत्या. याशिवाय अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस हे देखील संघात आहेत. दिनेश चंडिमलचंही टी20 संघात पुनरागमन झालं आहे. तो 2022 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता तो टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेतूनच संघात परतत आहे.

वनिंदू हसरंगा आणि महिष तिक्ष्णा या दोन फिरकीपटूंचीही संघात निवड झाली आहे. ड्युनिथ वेललागे हा देखील संघाचा भाग आहे. मथिशा पाथिराना, दुष्मंथा चमीरा, नुवान थुसारा आणि बिनुरा फर्नांडो सारखे वेगवान गोलंदाजही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ – चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दसून शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महिश तिक्ष्णा, चामिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका देखील खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असली तर श्रीलंकेचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंका मालिकेपूर्वी, भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
टीम इंडियाच्या या स्टार गोलंदाजाचं भविष्य संपलं? एकेकाळी दुसरा बुमराह म्हणून होती ओळख
टी20 आशिया चषकात शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू, दिग्गज मिताली राजचा विक्रम मोडला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---