देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे श्रीलंका आगामी आशिया चषकासाठी वेळेवर संघ घोषित करू शकला नाही. शनिवारी (२० ऑगस्ट) अखेर त्यांचा संघ समोर आला आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या २० सदस्यीय संघात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चंदीमल याला निवडले गेले आहे. तसेच १९ वर्षी मथीशा पथिराना यालाही संघात सामील केले गेले आहे.
दिनेश चंदीमल (Dinesh Chandimal) जून-जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत सहभागी नव्हता. त्याने शेवटचा टी-२० सामना भारताविरुद्ध यावर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळला होता. आशिया चषकासाठी संघात मथीशा पथिरानाला सहभागी केले गेले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथिरानाच्या गोलंदाजीची एक्शन लसिथ मलिंगा प्रामाणेच असते. याच कारणास्तव त्याला जूनियर मलिंगा म्हटले जाते. अलिकडच्या काळात चांगले प्रदर्शन करणारे पथुम निसांका, कुसल मेंडिस आणि चरिथ असलांका यांना संघात स्वतःची जागा बनवली आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये भानुका राजपक्षे याने चमकदार कामगिरी केली होती. श्रीलंकेने त्यांच्या संघात चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. वानिंदु हसरंगा, महीशा तिक्षणा, जेफरी वांडरसे आणि प्रवीण जयविक्रमा यांनाही संघात निवडले गेले आहे. आशिया चषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंकन संघ २७ ऑगस्टला अफगाणिस्तानशी, तर एक सप्टेंबर रोजी बांगलादेश संघाविरुद्ध खेळेल.
पथिरानाव्यतिरिक्त त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजाच्या रूपात दुष्मंथा चमीरा आणि चमिका करुणारत्ने आहेत. निवडकर्त्यांनी सुरुवातीला बिनुरा फर्नांडोला देखील निवडले होते, पण एसएलसी इनविटेशनल टी-२० लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे आशिया चषकात सहभागी होऊ शकला नाही. असिथा फर्नांडोने त्याची जागा घेईल. श्रीलंकन संघ कसुन रजिताच्या गैरहजेरीत आशिया चषक खेळण्यासाठी यूएईला रवाना होईल, जो दुखापतग्रस्त आहे.
आशिया चषकासाठी निवडलेला श्रीलंका संघ –
दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुशल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, महीश तिक्षणा, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथीशा पथिराना, दिनेश चांदीमल, नुवानिंदु फर्नांडो, कसुन रजिता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दु:खद! भारतीय फुटबॉलला ‘सुवर्ण युग’ दाखवणारा दिग्गज हरपला, ‘बद्रू दा’ यांचे निधन
शार्दुलपुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांची दाणादाण, ३९ षटकातच यजमान सर्वबाद; भारतापुढे सोपे आव्हान