श्रीलंका संघ (sri lanka) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी पुढे येत आहे. श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल (suranga lakmal) याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर तो क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेणार आहे.
श्रीलंका क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे की, “श्रीलंकाचा माजी कसोटी कर्णधार सुरंगा लकमलने क्रिकेट श्रीलंकाला कळवले आहे की, श्रीलंकेचा आगामी २०२२ दौरा पूर्ण झाल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेणार आहे.”
लकमलने श्रीलंका क्रिकेटला यासंदर्भात माहिती देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात लिहिले की, “मला ही आश्चर्यकारक संधी देण्यासाठी आणि माझ्या मातृभूमीचा सन्मान परत आणण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी एसएलसीचा ऋणी आहे. मी या बोर्डाशी निगडीत असल्याचा आनंद आहे, ज्यांनी मला व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी आणि वैयक्तिक सुधारणा करण्यासाठी मदत केली.”
यावेळी लकमलने संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले. तो म्हणाला की, “माझ्याकडे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ, प्रशासकिय कर्मचारी आणि इतर सर्व सहायक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत सन्मानाव्यतिरिक्त काहीच नाहीय.”
दरम्यान, लकमलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने श्रीलंकासाठी अनेक सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत ६८ कसोटी सामने, ११ टी-२० सामने आणि ८६ एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने ११०० पेक्षा अधिक धावा आणि २८५ विकेट्स नावावर केल्या आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ फेब्रुवारीला सुरू होईल, तर दुसरा सामना ५ मार्चपासून सुरू होईल. त्यानंतर टी-२० मालिकेतील सामने १३, १५ आणि १८ मार्चला खेळले जातील. तत्पूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मेगा लिलावातून नाव मागे घेतल्यानंतर आर्चरचा यू टर्न, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयने केलंय शॉर्टलिस्ट
‘पुणेरी पलटण’ने ‘यू मुंबा’ना दिली शिकस्त, अवघ्या २ गुणांच्या फरकाने सामन्यात मारली बाजी
ब्रेकिंग! भारतीय संघात कोरोनाचा स्फोट? वेस्ट इंडिज मालिकेपूर्वीच ‘हे’ दिग्गज खेळाडू बाधित