पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजले असतानाच श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार लसिथ मलिंगा याने टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून त्याने आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. त्याने कसोटी व वनडे क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे.
सोशल मीडियावरून दिली माहिती
मलिंगाने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची बातमी सोशल मीडियावरून दिली. त्याने लिहिले,
‘मागील १७ वर्ष मी क्रिकेटच्या मैदानावर घेतलेला अनुभव आता खेळाडू म्हणून कोणत्याही मैदानावर उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करतो. मात्र, माझा श्रीलंकेच्या सर्व युवा खेळाडूंना नेहमीच पाठिंबा राहील.”
आगामी टी२० विश्वचषकासाठी निवड न झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
टी२० विश्वचषक विजेता कर्णधार
जगातील सर्वोत्तम टी२० वेगवान गोलंदाज अशी ख्याती असणारा मलिंगा आपल्या विचित्र गोलंदाज ॲक्शन व आगळ्यावेगळ्या हेअर स्टाईलसाठी ओळखला जात होता. मलिंगाने सततच्या दुखापतीमुळे २०११ साली कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतलेला. त्यानंतर, त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले. २०१४ मध्ये श्रीलंकेने बांगलादेशातील झालेला टी२० विश्वचषक आपल्या नावे केला होता. या विश्वचषकात तो संघाचा कर्णधार राहिलेला.
JUST IN: Lasith Malinga has announced retirement from all forms of cricket. pic.twitter.com/NYrfgpQPqR
— ICC (@ICC) September 14, 2021
शानदार राहिली कारकीर्द
सध्या ३८ वर्षाच्या असलेल्या मलिंगाने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हॅट्रिक आहेत. त्याने तीन वेळा वनडे तर दोन वेळा टी२० मध्ये अशी कामगिरी केली होती. सलग चार चेंडूवर चार बळी घेण्याची कामगिरी त्याने दोन वेळा केली आहे.
मलिंगाने आपल्या कारकीर्दीत ३० कसोटी खेळताना १०१, २२६ वनडेमध्ये ३३८ व ८४ टी२० मध्ये १०७ बळी मिळवले होते. मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने २००८-२०१९ या काळात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना १२२ सामन्यात १७० बळी आपल्या नावे केले आहेत. यादरम्यान चार वेळ मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
मितालीचे वनडे क्रमवारीतील ‘राज्य’ कायम, पण दक्षिण आफ्रिकेची ‘ही’ खेळाडू आली बरोबरीवर
मॅंचेस्टर कसोटी मुद्द्यावर अखेर झुकली ईसीबी? बीसीसीआयशी करू शकते चर्चा
टी२० विश्वचषकात रथी-महारथी प्रशिक्षकांना भारतीय म्हणून एकटे शास्त्री गुरुजीच देणार टक्कर