क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान प्रमाणेच लंका आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही हाय व्होल्टेज होऊ लागले आहेत. श्रीलंकेने शनिवारी 9 मार्चला बांगलादेशविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने ट्रॉफीसह पोज देताना ‘टाइम-आउट’ सेलिब्रेशन केले आहे. कारण विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान टाइमआउटचा वाद चर्चेत होता. बांग्लादेशच्या निर्णयामुळे श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज टाइम-आउटमुळे बाद होणारा पहिला खेळाडू ठरला होता.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 28 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली आणि अनोख्या सेलिब्रेशनसह बांगलादेश डवचले आहे. तसेच श्रीलंकेने त्यांच्या इंस्टाग्रामवर ट्रॉफीसह एक फोटो पोस्ट केला, ज्यात सर्व खेळाडू त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाकडे इशारा करताना दिसले आहेत. तसेच या सेलिब्रेशननुसार ते घड्याळ दाखवत आहेत.
याबरोबरच भारतातील विश्वचषक 2023 दरम्यान टाइम-आउट संदर्भात दोन्ही संघांमध्ये वाद सुरू झाला होता, जेव्हा अँजेलो मॅथ्यूज वेळेवर मैदानावर न पोहोचल्यामुळे त्याला बाद करण्यात आले होते. आता श्रीलंकेने पुन्हा एकदा टाईम आऊट मुद्दयावरून बांग्लादेश संघाला डिवचलं आहे. तसेच खेळाडूंनी ही पोज देताच श्रीलंकेच्या हजारो चाहत्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी सुरू केली. चाहत्यांनी खेळाडूंच्या समर्थनार्थ येऊन बांगलादेशला चिडवले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा वातावरण तापले आहे.
अशातच 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 174 धावा करता आल्या. कुसल मेंडिसने 55 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 6 षटकारही मारले. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला बांगलादेशचा संघ अवघ्या 146 धावांत सर्वबाद झाला आणि सामना 28 धावांनी गमावला. या विजयासह श्रीलंकेने ही मालिकाही 2-1 ने जिंकली आहे.
Time out celebration 😂 pic.twitter.com/ijFTqhDu1Z
— SRI LANKA CRICKET LIONS (@slcricketlions) March 9, 2024
दरम्यान, नुवान तुषाराने आपल्या सनसनाटी गोलंदाजीवर हॅटट्रिक मिळवली. तुषाराने कौशल्य आणि अचूकतेच्या जोरावर महमुदुल्लाला LBW बाद करून आपली हॅटट्रिक घेतली आहे. तसेच तुषाराची हॅट्ट्रिक हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता, ज्यामुळे बांगलादेशच्या पुनरागमनाच्या आशा इथेच संपुष्टात आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
- WPL 2024 : RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- IPL 2024 : आयपीएलपूर्वी KKRच्या संघात जेसन रॉयच्या जागी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एंट्री