आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या हंगामाला जून महिन्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तत्पूर्वी, प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड व न्यूझीलंडनंतर आता श्रीलंकेने देखील आगामी वर्षासाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. नव्या गुणांकन पद्धतीने २४ खेळाडूंचा या यादीमध्ये समावेश केला गेला असून, तब्बल आठ खेळाडूंना करारातून वगळले आहे.
अशी असेल नवीन गुणांकन पद्धत
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष अरविंद डिसिल्वा व संघाचे संचालक टॉम मूडी त्यांनी नव्या गुणांकन पद्धतीबाबत माहिती दिली. या गुणांकन पद्धतीत खेळाडूंना एकूण १०० गुणांपैकी गुण देण्यात येतील. यामध्ये ५० गुण हे खेळाडूंच्या कामगिरीसाठी राखीव असतील. २० गुण तंदुरुस्ती, तर प्रत्येकी १० गुण अनुक्रमे नेतृत्व क्षमता, व्यावसायिकता व भविष्यात होऊ शकणारी कामगिरी यासाठी दिले जाणार आहेत.
तंदुरुस्तीसाठी असलेले २० गुण मिळवण्याची संधी खेळाडूंना राहील. स्किन फोल्ड चाचणीमध्ये ७५ पेक्षाकमी रेटिंग आल्यास व २ किलोमीटर अंतर ८ मिनिट ३५ सेकंदांमध्ये पार केल्यास हे पूर्ण २० गुण खेळाडूस दिले जातील.
हे खेळाडू झाले करारबद्ध
ए १ (१ लाख अमेरिकन डॉलर्स)- निरोशन डिकवेला, धनंजय डी सिल्वा
ए २ (८० हजार अमेरिकन डॉलर्स)- कुसल परेरा, अँजेलो मॅथ्यूज
ए ३ (७० हजार अमेरिकन डॉलर्स)- दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडीस
बी १ (६५ हजार अमेरिकन डॉलर्स)- सुरंगा लकमल, दसुन शनाका
बी २ (६० हजार अमेरिकन डॉलर्स)- वनिंदू हसरंगा, लसिथ एम्बुलडेनिया
बी ३ ( ५५ हजार अमेरिकन डॉलर्स)- पथुम निसांका, लाहिरू थिरीमन्ने
सी १ (५० हजार अमेरिकन डॉलर्स)- दुश्मंथा चमिरा, कसुन रजिता
सी २ (४५ हजार अमेरिकन डॉलर्स)- दिनेश चंडीमल, लक्षण संदकन
सी ३ (४० हजार अमेरिकन डॉलर्स)- इसुरू उदाना, विश्वा फर्नांडो
डी १ (३५ हजार अमेरिकन डॉलर्स)- रमेश मेंडिस, ओशाडा फर्नांडो
डी २ (३० हजार अमेरिकन डॉलर्स)- दनुष्का गुणतिलका, लाहिरू कुमारा
डी ३ (२५ हजार अमेरिकन डॉलर्स)- ओशेन बंडारा, अकिला धनंजय
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजाने कमिन्ससह ४ ऑसी गोलंदाजांना ओढले बॉल टेम्परिंग प्रकरणात; म्हणाला, त्यांच्या साथीदाराने
ट्वेंटी ट्वेंटीत एकही शतक न झळकावता ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, धोनीचाही समावेश