वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरूवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यांनी केवळ 33.2 षटकात इंग्लंडचा 156 धावांमध्ये खुर्दा उडवला. त्यानंतर फक्त दोन गडी गमावत त्यांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मागील चार विश्वचषकातील आपल्या विजयाची परंपरा कायम राखली.
दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा डाव अचानक ढेपाळला व ते केवळ 156 धावांमध्ये सर्वबाद झाले. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली होती. फक्त 23 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर पथुम निसंका व सदिरा समरविक्रमा यांनी नाबाद शतकी भागीदारी करून आपल्या संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. यासह त्यांनी थेट गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.
श्रीलंका संघाने सलग पाचव्या विश्वचषकात इंग्लंडला विजय मिळवू दिला नाही. 2007 मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकात त्यांनी इंग्लंडचा पाडाव केला होता. त्यानंतर 2011 वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेने इंग्लंडला मात दिली होती. त्यानंतर 2015 वनडे विश्वचषकावेळी कुमार संगकाराच्या शतकाने इंग्लंड विजयापासून वंचित राहिली होती. तर मागील विश्वचषकात श्रीलंकेने कमबॅक करत विजय संपादन केला होता. त्यानंतर आता सलग पाचव्यांदा श्रीलंका संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
(Srilanka Unbeaten Against England In ODI World Cup Since 2007)
महत्वाच्या बातम्या
आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया