आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत 23 धावांनी विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला. याचबरोबर श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंगा हे श्रीलंकेच्या विजयाचे नायक ठरले.
Sri Lanka 𝐖𝐈𝐍 the #AsiaCup2022 🏆
Scorecard: https://t.co/xA1vz7cSW0 pic.twitter.com/IL3DaXmwIs
— ICC (@ICC) September 11, 2022
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा याने पहिल्या षटकात योग्य ठरवला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कुसल मेंडीसचा त्याने शून्यावर त्रिफळा उडविला. दुसरा सलामीवीर पथुम निसंका 8 व धनुष्का गुणथिलका एका धावेवर माघारी परतले. चांगल्या लयीत दिसत असलेल्या धनंजय डी सिल्वाला इफ्तिखारने 28 धावांवर बाद केले. कर्णधार दसून शनाका हा या अंतिम सामन्यात अपयशी ठरला.
त्यानंतर आलेल्या वनिंदू हसरंगाने भानुका राजपक्षेला साथ देत वेगवान फलंदाजी केली. दोघांनी शानदार अर्धशतकी भागीदारी करत संघाला शतकी मजल मारून दिली. हसरंगा 21 चेंडूवर 36 धावांची खेळी करत बाद झाला. हसरंगा बाद झाल्यानंतरही राजपक्षेने आपले आक्रमण कायम ठेवले व 35 चेंडूवर स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 45 चेंडूवर 45 चेंडूवर नाबाद 71 धावा केल्या. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हारिस रऊफने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजेतेपदासाठी 171 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पाकिस्तानला कर्णधार बाबर आझमच्या रूपाने पहिला धक्का बसला. पुढच्या चेंडूवर फखर झमानही शून्यावर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी दहा षटकात 71 धावा जोडल्या. इफ्तिखार 32 व नवाज 6 धावांवर माघारी गेल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. मात्र, सलामीला आलेल्या रिझवानने 47 चेंडूत अर्धशतक केले. परंतु, वनिंदू हसरंगाने रिझवान, आसिफ अली व खुशदील शाह यांना एकाच षटकात बाद करत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवला. नसीम शहाने काही षटकार मारत थोडीफार झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर त्याला बाद करत करुणारत्नेने पाकिस्तानचा डाव 147 धावांवर संपवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 Final: पाकिस्तानने टॉस जिंकून अर्धा सामना घातला खिशात! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत