नुकत्याच झालेल्या टोकिओ ऑलिंपिक २०२० मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावत केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला. यामुळे जगभरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. जगभरातून अनेक मोठ-मोठ्या व्यक्तींनी नीरजच्या या कामगिरीचे अभिनंदन केले.
त्यातच आता श्रीलंकाचा माजी वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाधने नीरजच्या या सुवर्णपदकाला केवळ भारताचाच नव्हे तर पुर्ण भारतीय उपमहाद्वीपाचे सुवर्णपदक म्हणून संबोधले.
भारतीय उपमहाद्वीपात भारताबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ सारख्या देशांचा समावेश आहे. धम्मिका प्रसादनुसार नीरज चोप्राने जिंकलेला हा सुवर्ण पदक हा या संपूर्ण भागाचे सुवर्णपदक आहे.
श्रीलंकामधून डेक्कन क्रोनिकलशी बोलताना धम्मिका प्रसाद म्हणाला, “याने काहीही फरक पडत नाही की, नीरज कुठून आला आहे. किंवा यानेही फरक पडत नाही की. मी कोण आहे? नीरजने भारतासाठी जिंकलेले हे सुवर्णपदक हे आम्हा सर्व दक्षिण आशियाई क्षेत्रातील लोकांसाठीचे सुवर्णपदक आहे.”
पुढे तो म्हणाला, “यासाठी आम्ही खरंच खूप खुश आहोत आणि आपल्याला नीरजची प्रशंसा देखील केली पाहिजे. मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा श्रीलंकासाठी श्रीमती सुशंतिका जयसिंहने रजत पदक जिंकले होते. तेव्हा संपूर्ण देशभरात या विजयाला साजरे करण्यात आले होते. याच्या थोड्या आधी मिस्टर डंकन व्हाईटने श्रीलंकासाठी पहिले पदक जिंकले होते. याचा आम्ही राष्ट्रीय स्तरावर जल्लोष केला होता. जसे की हे पदक आम्ही स्वतः जिंकले आहे. मी आशा करतो की सर्व भारतीयांनी देखील नीरजच्या विजयानंतर असेच अनुभवले असेल.”
“ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे हे कोणत्याही खेळाडूसाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे असते. नीरजने ते एकदम सुंदर प्रकारे आणि योग्य रितीने केले. यामुळे तो खेळातील सर्व प्रकारच्या सन्मान आणि प्रशंसाचा मानकरी आहे.”
“मला आठवते जेव्हा श्रीलंकामध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत होता. तेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी आमची मदत केली होती. यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील. शेवटी मी नीरज चोप्राचे त्याच्या ऑलम्पिक २०२० मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुन्हा एकदा त्याचे अभिनंदन करू इच्छितो.” असेही धम्मिका प्रसाद म्हणाला.
ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत नीरज सोबत पाकिस्तानचा अरशद नदीम देखील होता. तेव्हा माध्यमांनी याला वेगळेच रूप देत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढाई असे म्हणत या गोष्टीला सादर केले होते. याला देखील क्रिकेट सारखेच भारत विरुद्ध पाकिस्तान असे स्वरूप दिले गेले होते.
मात्र, नीरजला जेव्हा याबाबत विचारले गेले. तेव्हा त्याने अरशदला पदक न मिळाल्याने दुःख व्यक्त केले. कारण, असे झाले असते तर अथलेटिक्समध्ये आशियाला चांगली उंची प्राप्त झाली असती. त्यामुळे एक ऍथलिट केवळ गाव, शहर, राज्य किंवा देशात पुरता विचार न करता पूर्ण विश्वभराचा विचार करत असतो. त्यामुळे धम्मिका प्रसादच्या मते, नीरज चोप्राचे सुवर्णपदक हे केवळ भारताचेच नव्हे तर भारतीय उपमहाद्वीपचा सुवर्णपदक आहे.
महत्वाच्या बातम्या –
–लॉर्ड्सवर शतक झळकवणाऱ्या केएल राहुलने एकेकाळी ‘या’ कारणामुळे स्वतःला १४ दिवस केले होते घरात बंद
–‘टेक ऑफ टू युएई’! मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबुधाबीला रवाना, सीएसकेचा संघही दुबईत दाखल, पाहा व्हिडिओ
–वॉन-जाफर यांच्यातील ‘कोल्डवॉर’ अद्यापही सुरुच; भारतीय क्रिकेटरकडून पुन्हा माजी कर्णधार ट्रोल