के पी एच ड्रीम क्रिकेट प्रा. लि ज्यांची आयपीएचा संघ असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मालकी आहे, त्यांनीच सीपीएलमधील सेंट ल्युसिया झुक्स संघ खरेदी केला आहे. सीपीएल २०२० मधील संघाच्या पहिल्या सामन्यांच्या पुर्वसंधेला त्यांनी नवीन जर्सी व वेबसाईट (www.zouksonfire.com) चे अनावरण केले आहे.
नव्या जर्सी मध्ये पिवळा व निळा रंगाचा तालमेल साधला आहे ज्यात पिवळा रंग सुर्याची शक्तीचे तर निळा रंग सेंट ल्युसिया देशाच्या भोवती असणाऱ्या निळाशार समुद्राचे प्रतिक आहे. या सत्रात इंडीबेट हे प्रायोजक म्हणुन असतील तर ऑर्बिट एक्सचेंज व क्रिकेटमोर हे सहयोगी प्रायोजक असतील.
Media Day with the Zouks! New Kit new season! #CPL20 #ZouksOnFire #ZouksSaChaud #Indibet pic.twitter.com/o6xuDgLlFE
— Saint Lucia Kings (@SaintLuciaKings) August 18, 2020
२०२० च्या कॅरेबियन प्रिमियर लिगमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी सहा संघ एकमेकांविरोधात उभे ठाकतील. सेंट ल्युसिया झुक्स संघाचे नेतृत्व वेस्ट इंडिज संघाला दोनदा टी-२० विश्वविजेतेपद पटकावुन देणारा कर्णधार डॅरेन सॅमी करणार आहे तसेच झिम्बाब्वेचे माजी यष्टिरक्षक अँडी फ्लॉवर प्रशिक्षकाची भुमिका निभावताना दिसतील. संघाची मदार ही कर्णधार सॅमी सोबतच नबी, आंद्रे फ्लेचर, केसरिक विल्यम व नजिबुल्लाहवर असेल.
संघ – डॅरेन सॅमी (कर्णधार),मोहम्मद नबी, आंद्रे फ्लेचर, केसरिक विल्यम, रखिम कॉर्नेल, केमर होल्डर, जावेल ग्लेन, मार्क देयल, लेनिको बाऊचर, काविम हॉज, ओबेद मॅकॉय, किमानी मेलियस,साद बिन जफर,स्कॉट कुगेनिन,रोस्टन चेस, नजिबुल्लाह झदरान, झहीर खान