फुटबॉलच्या मैदानात सातत्याने प्रेक्षकांमध्ये मारहाणीच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता साल्वाडोर येथे घडली आहे. एका स्थानिक सामन्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 12 लोकांचा बळी गेला असून, 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
साल्वाडोरच्या राजधानीपासून जवळच असलेल्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये ही घटना घडली. या स्टेडियममध्ये देशांतर्गत लीगचा उपांत्यपूर्व सामना खेळला जात होता. अलियान्झा क्लब आणि एफएएस क्लब यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल झाले. प्रेक्षकांची संख्या जास्त झाल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अवघ्या 16 मिनिटांनी सामना रद्द करण्यात आला. स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सुरू झाल्याने लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले.
मिळत असलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व रुग्णालयांत या अपघातामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच सुमारे 500 लोक जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
(Stampede In EL Salvador Football Stadium 12 Killed)