भारतीय संघ इंग्लंडवरून वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघनिवड समितीने काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यातील वनडे मालिकेत शिखर धवन तर टी२० मालिकेत रोहित शर्मा टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघात केएल राहुल (KL Rahul) याने पुनरागमन केले आहे. त्याच्या तयारीसाठी तो चांगली मेहनत घेत आहे. राहुलने जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया केली आहे. यानंतर तो पूर्णपणे फिट असून त्याने फलंदाजीच्या सरावाला सुरूवात केली आहे. भारताने जाहीर केलेल्या टी२० संघामध्ये राहुलचे नाव आहे. त्याच्या आणि कुलदीप यादवच्या फिटनेसवर शंका उपस्थित केली होती.
अशातच राहुलने केलेल्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका चाहत्याने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून त्यामध्ये राहुल बंगळुरू येथिल राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. यावरून राहुल लवकरच आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
#KLRAHUL backs to nets.Started practicing Ahead of #IndvsWI series. pic.twitter.com/JRhT8A1Ngl
— KLRAHUL TRENDS™ (@KLRahulTrends_) July 16, 2022
राहुलला दुखापतीमुळे भरपूर सामन्यांना मुकावे लागलो होते. त्याला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघामध्ये घेतले होते. या पाच सामन्यांच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार होता. यामुळे त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंत (Rishabh Pant) याने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. तसेच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये झालेल्या सहाही सामन्यात त्याची भारतीय संघात जागा पक्की होती. मात्र तो एकही सामन्यात खेळू शकला नाही.
राहुलने शेवटचा क्रिकेटचा सामना आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने २०२२च्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले होते. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने १५ सामन्यात ५१ पेक्षा अधिकच्या सरासरीने ६१६ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिला वनडे सामना २२ जुलै तर पहिला टी२० सामना २९ जुलैला खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान ३१ जुलैला येणार आमने-सामने, वाचा कधी आणि कुठे रंगणार सामना
बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम
भारताचा ‘सूर्या’उदय होण्यात कॅप्टन रोहित शर्माचा मोठा हात