Loading...

राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा : पुणे शहर संघ अंतिम फेरीत

पुणे। पुणे शहर संघाने महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला.

चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. रविवारी झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य लढतीत पुणे शहर संघाने औरंगाबाद शहर संघावर २-०ने मात केली. यात पुणे शहर संघाकडून अब्बास कडीवाले (४, १३ मि.) यांनी गोल केले. आता पुणे शहर संघाची विजेतेपदासाठी सातारा शहर विरुद्ध लढत होईल. दुस-या उपांत्य लढतीत सातारा शहर संघाने सांगली जिल्हा संघावर ७-१ने मात केली. यात सातारा संघाकडून हरिश मोरे (६, ११, १३ मि.) याने तीन, तर विनायक माळी (७, ९ मि.) याने दोन गोल केले. संकेत बलीप (२ मि.), सिद्ध बरगे (८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सांगलीकडून एकमेव गोल मयुरेश शहा (३ मि.) याने केला.

यानंतर पुणे जिल्हा संघाने १२ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यात उपांत्य फेरीत पुणे जिल्हा संघाने नवी मुंबई अ संघाचा ३-०ने पराभव केला. पुणे जिल्हा संघाकडून मोइझ भागेला (३, १२ मि.) याने दोन, तर अयाद अमीर (१३ मि.) याने एक गोल केला.

Loading...
You might also like
Loading...