Loading...

राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा: पुणे शहर संघाने पटकाविले विजेतेपद

पुणे। पुणे शहर संघाने महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पधेर्तील १७ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत पुणे शहर संघाने सातारा शहर संघावर मात केली.

चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत पुणे शहर संघाने सातारा शहर संघावर टायब्रेकमध्ये २-०ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात पुणे शहर संघाकडून अब्बास कलाईवाले आणि गणेश सिनारे यांनी गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. साताराकडून सिद्ध बरगे, संकेत यांना गोल करण्यात अपयश आले.

स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगर ब संघाने विजेतेपद मिळवले. मुंबई उपनगर संघाने अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघावर टायब्रेकमध्ये २-१ने मात केली. निर्धारित वेळेत लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. यात मुंबई उपनगरकडून रुहान (३ मि.) याने, तर पुणे जिल्ह्याकडून अर्षद अमीन (५ मि.) याने गोल केला. यानंतर टायब्रेकमध्ये पुणे जिल्ह्याच्या सय्यद झैद, वंश गोयल, अर्षद अमीन यांना गोल करण्यात अपयश आले. मुंबईकडून जोशवा अलमर याने गोल केला, तर आंद्रिअनो रॉड्रिगेज, आर. फर्नांडो यांना गोल करण्यात अपयश आले.

Loading...

स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरने टायब्रेकमध्ये बाजी मारली. मुंबई उपनगरने अंतिम लढतीत पुणे संघावर १-०ने मात केली. यात निर्धारित वेळेत लढत ०-० बरोबरीत सुटली. त्यामुळे शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात पुणे संघाकडून एकीलाही गोल करता आला नाही, तर मुंबई उपनगरच्या शारीवा कदमने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

You might also like
Loading...