Loading...

राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा: पुणे जिल्हा संघाची विजयी सलामी

पुणे। महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाने विजयी सलामी दिली. पुणे जिल्हा संघाने सलामीच्या लढतीत पुणे ग्रामीण संघावर मात केली.

चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून २० जिल्ह्यातील ३५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमधून मध्यप्रदेश येथील इंदोरमध्ये होणा-या राष्ट्रीय मिनी फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अविनाश बागवे, पुणे जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जाधव, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते ताहीर आसी, समीर पठाण, तकदीर सय्यद यांच्या उपस्थित होते.

शनिवारी झालेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाने पुणे ग्रामीण संघावर ८-०ने मात केली. यात अयाद शेखने (३, ४, ५, ९ मि.) हॅटट्रिक नोंदवली, तर मोइझ शेख (२, ८ मि.) याने दोन आणि अयान शेख (९ मि.), रेहान शेख (१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. याच गटात पिंपरी-चिंचवड जिल्हा संघ आणि सातारा जिल्हा यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.

इतर लढतींत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबई उपनगर ब संघाने पिंपरी-चिंचवड जिल्हा संघावर १-०ने, पिंपरी-चिंचवड शहर संघाने सांगली जिल्हा संघावर ३-०ने मात केली. यानंतर बीड शहर संघाने सातारा शहर संघावर ३-०ने, तर नवी मुंबई संघाने सातारा जिल्हा संघावर १-०ने मात केली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाला औरंगाबाद शहर संघाने गोलशून्य बरोबरीत रोखले. यानंतर पुणे जिल्हा संघाने आपल्या दुस-या लढतीत सातारा जिल्हा संघावर ३-०ने मात केली.

निकाल :
१२ वर्षांखालील मुले –

Loading...

१) पिंपरी-चिंचवड जिल्हा – १ (विराज वर्धमाडे ४ मि.) बरोबरी वि. सातारा जिल्हा – १ (सुफियान शेख ९ मि.).
२) पुणे जिल्हा – ८ (अयाद शेख ३, ४, ५, ९ मि., मोइझ शेख २, ८ मि., अयान शेख ९ मि., रेहान शेख १ मि.) वि. वि. पुणे ग्रामीण – ०.

१४ वर्षांखालील मुले –

Loading...

१) मुंबई उपनगर ब – १ (अ‍ॅडव्हिन रॉडरिक ७ मि.) – वि. वि. पिंपरी-चिंचवड जिल्हा – ०.
२) पिंपरी-चिंचवड शहर – ३ (सुमीत माने ६, १२ मि., सार्थक अभिनव १३ मि.) वि. वि. सांगली जिल्हा – ०.
३) बीड शहर – ३ (आदिल मोमिन २, ३, ६ मि.) वि. वि. सातारा शहर – ०.
४) नवी मुंबई – १ (रणवीर ठाकूर ११ मि.) वि. वि. सातारा जिल्हा – ०.

१७ वर्षांखालील मुले –

१) पुणे जिल्हा -० बरोबरी वि. औरंगाबाद शहर – ०.
२) पुणे जिल्हा – ३ (फझल खान ४ मि., यश वर्धन ६, १७ मि.) वि. वि. सातारा जिल्हा – ०.
३) सातारा शहर – २ (संकेत बालीब १ मि., सिद्धे बारगे २ मि.) वि. वि. मुंबई उपनगर – १ (विवेक रॉय ४ मि.).

१९ वर्षांखालील मुली –

मुंबई – ३ (शरिवा कदम ३,४, २१ मि.) वि. वि. पुणे – ०.

You might also like
Loading...