जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढत होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ एकात्र खेळणार आहेत. पुजारा आणि स्मिथ चालू महिन्यात काउंटी संघ ससेक्ससाठी तीन सामने खेळणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल स्टेडियमवऱ खेळला जाणार आहे. पुजारा मागच्या मोठ्या काळापासून ससेक्स संघासाठी खेळत आहे आणि संघाचे नेतृत्व देखील त्याच्याकडे आले आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ () देखील पुढच्या तीन सामन्यांमध्ये ससेक्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यांमध्ये पुजारा तिसऱ्या, तर स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. हे तीन सामने अनुक्रमे वॉर्सेस्टरशर (4 त 7 मे), लिसेस्टरशर (11 ते 14 मे) आणि ग्लेमोर्गन (18 ते 22 मे) खेळले जाणार आहेत.
या तीन सामन्यांमध्ये स्मिथ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी आणि आगामी ऍशेस मालिकेसाठी तयारी करू इच्छित आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जाणारी ऍशेस मालिका यावर्षी 16 जूनपासून सुरू होणार आहे. चेतेश्वर पुजाराला स्मिथ ससेक्ससाठी खेळण्याविषयी विचारले गेले. यावर पुजारा म्हणाला, “आम्ही सर्वजन एकमेकांसोबत बोलत असतो, पण बहुतांश वेळा आम्ही एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत. आम्ही कधीच एका संघात खेळलो नाहीत. त्यामुळे त्याच्यासोबत संघात असणे रोमांचक असेल. यादरम्यान मी त्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करेल.”
“आम्ही डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळणार आहोत, त्यामुळे हा एक वेगळा अनुभव असेल. मैदानात आम्ही नेहमीच एकमेकांना कडवे आव्हान दिले आहे. पण मैदानाबाहेर आम्ही चांगले मित्र आहोत. मी त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. मी त्याच्यासी चर्चा करण्याचा आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल. तो अनुभवी खेळाडू आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने खूप धावा केल्या आहेत. अशात तो कशा पद्धतीने तयारी करतो, याकडे माझे लक्ष असेल,” असेही पुजारा म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यावर्षी 42 सामन्यात 24वेळा संघांनी केल्या 200+ धावा, जाणून घ्या धावांचा पाऊस पडण्यामागचं नेमकं कारण
‘धोनी नाही होणार निवृत्त’, सीएसकेच्या प्रशिक्षकांचे सूचक वक्तव्य, पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाले…