भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका पुढील महिन्यात सुरू होत आहे. 9 फेब्रुवारी रोजी चार सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होईल. मागील सोळा वर्षापासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याचे प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघ करत आहे. मात्र, या मालिकेसाठी भारतात येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने एक वादग्रस्त विधान केले आहे.
नुकताच मेलबर्न येथे क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये स्मिथने डेव्हिड वॉर्नर व ट्रेविस हेड यांना मागे टाकत सर्वात्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार आपल्या नावे केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आता भारत दौऱ्यासाठी रवाना होईल. यादव याविषयी बोलताना त्याला एकही सराव सामना आयोजित न केल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“आम्ही भारतात सराव सामना खेळत नाहीत तेच बरे आहे. कारण, सराव सामन्यात वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी देण्यात येते. तर, मुख्य मालिकेवेळी मात्र सर्व खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना अनुकूल असतात. यापेक्षा नेटमध्ये अधिकाधिक सराव करण्याचा आमचा मानस आहे. मला भारतात खेळायला आवडते. मी दोन वेळा भारत दौरा केला असून, मालिका जिंकण्यात आम्हाला अपयश आलेले. मात्र, यावेळी विजय मिळण्याचा संपूर्ण प्रयत्न असेल.”
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चार सामन्यांच्या या मालिकेला नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा सामना धर्मशाला व अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. सध्या भारतीय क्रिकेट संघाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. भारताने 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका आपल्या नावे केली होती. त्यामुळे आता भारताला भारतात पराभूत करण्याचे शिवधनुष्य ऑस्ट्रेलियन संघाला उचलावे लागणार आहे.
(Steve Smith Big Statement On No Practice Matches In India Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स