ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला. चेन्नई येथे झालेला मालिकेतील हा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत 2-1 अशा अंतराने मालिका नावावर केली. ऑस्ट्रेलियन संघाच्या या विजयाचे श्रेय कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला दिले जात आहे. कारण नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतल्यानंतर त्याने संघाचे नेतृत्व स्वीकारत ऑस्ट्रेलियन संघाला विजयी मार्गावर आणण्याची कामगिरी करून दाखवली.
ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका व त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी आला होता. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावे लागले. त्यानंतर कौटुंबिक कारणाने ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा मायदेशी परतला.
Steve smith and captaincy is a match made in heaven👌#INDvAUS
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 22, 2023
कमिन्सच्या जागी प्रदीर्घ कालावधीनंतर स्मिथ याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्याने आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करून देत विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलिया संघाला यश आले होते.
कसोटी मालिकेनंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत व्हावे लागले. मात्र, दुसऱ्या सामन्यात स्मिथच्या नेतृत्वाची कमाल पुन्हा एकदा दिसली. त्याने आपल्या गोलंदाजांचा अगदी योग्य वापर करत भारतीय संघाला 117 धावांवर गुंडाळले. त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाला सामना एकतर्फी जिंकून दिला. चेन्नई येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात देखील भारतीय संघ विजयाकडे आगेकूच करत होता. मात्र, मोक्याच्या वेळी त्याने ऍडम झंपा व एगर यांना गोलंदाजीला आणत भारताच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. त्याच्या चलाखीमुळे ऑस्ट्रेलिया संघ भारताला विजयापासून रोखू शकला. स्मिथच्या नेतृत्वाचे कौतुक करण्याचा मोह भारताचा अवल फिरकीपटू रविचंद्र अश्विन याला देखील आवरला नाही.
(Steve Smith Fabulous Captaincy On India Tour Ravichandran Ashwin Praised)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव