सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचचा शेवटचा वनडे सामना असल्याने महत्वाचा मानला जात आहे. ऍरॉन फिंच वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन चाहते नाराज होते. मात्र, त्यांना या परिस्थितीतही जल्लोश साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12वे शतक झळकावत विशेष खेळी केली आहे.
Superstar! That's ODI ton No.12 for Steve Smith, this one coming off 127 balls #AUSvNZ pic.twitter.com/v006wACPau
— cricket.com.au (@cricketcomau) September 11, 2022
न्यूझीलंडने यासामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच केवळ 5 धावांवर बाद झाल्यानंतर चाहते नाराज होते. मात्र, त्यानंतर संपूर्ण डावात स्मिथने वर्चस्व गाजवत 131 चेंडूत 105 धावांची विशेष खेळी केली. यावेळी त्याने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा किंग कोण? ‘या’ संघाने सर्वाधिकवेळा जिंकलाय कप, पाहा संपूर्ण यादी
वयाच्या 36 व्या वर्षीही स्टुअर्ट ब्रॉडची गाडी सुसाट! केली माजी दिग्गजाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी