नुकताच बिग बॅश लीग २०२१-२२ चा (Big Bash League 2021-22) अंतिम सामना (BBL Final) झाला. पर्थ स्कॉचर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Sydeny Sixers) यांच्यात झालेल्या या सामन्यात पर्थ संघाने ७९ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा बीबीएल ट्रॉफी जिंकली. या सामन्यापूर्वी उपविजेत्या सिडनी संघाने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याला आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) कडे अपील केली होती. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यास नकार दिला. यानंतर आता स्मिथने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खिल्ली उडवली आहे.
तर झाले असे की, ऍडलेड स्ट्राईकर्सविरुद्ध २६ जानेवारीला बीबीएलच्या प्लेऑफ सामन्यांपूर्वी सिडनी संघाने स्मिथला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु १३ सदस्यीय संघास मैदानावर उतरवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने परवानगी दिली नाही.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
खरे तर, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार स्मिथ हा यंदाच्या बीबीएल हंगामासाठी सिडनी संघाचा भाग होऊ शकत होता. पण ऍशेस मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेमुळे तो सिडनीसोबतचा आपला करार पुढे वाढवू शकला नाही. परंतु न्यूझीलंडविरुद्ध कोविड-१९ मुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडनी संघाने उर्वरित सामन्यांसाठी स्मिथला साईन करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क केला होता.
परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या नियमावर कायम राहिली. १० जानेवारी रोजी तयार करण्यात आलेल्या ‘स्थानिक बदली खेळाडू’च्या नियमानुसार, जर संघातील कोणत्या खेळाडूला दुखापत किंवा कोरोनाची लागण झाली, तरच बीबीएल संघ दुसऱ्या कोणत्या खेळाडूची निवड करू शकतात. सिडनी संघाचे अर्धे खेळाडू दुखापत आणि कोविड संक्रमणामुळे बाहेर होते. याचमुळे सिडनी संघाने स्मिथला संघात घेण्यासाठी अपील केली होती. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अपीलला अस्विकार केले.
यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मजा घेत स्मिथने अंतिम सामन्यापूर्वी एक मजेशीर इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्याने सिडनी सिक्सर्सच्या जर्सीतील आपला फोटो शेअर केला होता, ज्यावर त्याने आपल्या चेहऱ्यावर मोठा चष्मा आणि मिशी लावली होती. या गमतीशीर फोटोच्या बाजूला त्याने स्टिफॅनो स्मिथरिओ, असे नाव लिहिले होते.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, ‘आज रात्रीच्या बीबीएल अंतिम सामन्यासाठी सिडनी सिक्सर्सला गुड लक. तसेच इटालियनमधून आणलेल्या स्टिफॅनोलाही त्याच्या पदार्पणासाठी शुभेच्छा.’
स्मिथच्या या बोर्डाला टोला मारणाऱ्या पोस्टवर क्रिकेटपटूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-द्रविड जोडीवर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, ‘ते दोघे भारताला…’
U19 WC: कोरोनाचा कहर! ‘या’ संघातील ९ खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने २ सामने रद्द
हेही पाहा-