होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये पाहुण्या संघाला नमवत भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील या उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमन करणार अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने देखील त्याच दृष्टीने आपली तयारी सुरू केली.
तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा करेल. नियमित कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणाने मायदेशी परतल्याने त्याच्याकडे ही जबाबदारी तब्बल चार वर्षांच्या काळानंतर आली आहे. ही संधी साधण्यासाठी त्याने आता कंबर कसलेले दिसून येतेय.
इंदोर येथील पहिल्या सराव सत्रात स्मिथ फिरकीपटूंविरोधात सराव करताना दिसला. सुरुवातीला त्याने उस्मान ख्वाजासह फलंदाजी केली. स्मिथने जवळपास तासभर प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन व युवा मॅथ्यू कुन्हमन यांच्याविरुद्ध सराव केला.
ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज पहिल्या दोन सामन्यात भारताच्या फिरकीपटूं विरोधात संघर्ष करताना दिसले. हे फलंदाज खास करून स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, स्मित आपल्या सरावावेळी फ्रंट फूट डिफेन्स करताना दिसून आला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया फलंदाज बचावावर अधिक भर देणार असल्याचे दिसून येत आहे. याव्यतिरिक्त पीटर हॅंड्सकॉम्ब व मार्नस लॅब्युशेन हेदेखील अधिक काळ फिरकी गोलंदाजीचा सराव करत होते.
इंदोर कसोटीसाठी संभाव्य ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन-
उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, पीटर हॅंड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी व लान्स मॉरिस.
(Steve Smith Preparing Against Spinners Ahead Indore Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ’हा’ संघ खातोय भाव