आजपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा कसोटी सामना सरु झाला आहे. या सामन्यात एक गमतीशीर घटना पहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या स्टिव्ह स्मिथने तब्बल 39 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेतली.
स्मिथ खेळताना साधारणत: चांगल्या गतीने धावा करतो मात्र आज त्याच्या खेळीची सुरुवात एवढी संथ गतीने झाली की त्याने त्याच्या खेळीतील पहिली धाव 45 मिनिटे आणि 39 चेंडू खेळल्यानंतर घेतली.
या सामन्यात स्मिथ डेव्हिड वॉर्नर 45 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी मार्नस लॅब्यूशाने फलंदाजी करत होता. स्मिथने फलंदाजीला आल्यानंतर स्थिर होण्यास वेळ घेतला. अखेर 40 व्या षटकात त्याने निल वॅगनरच्या गोलंदाजीवर या सामन्यातील आपली पहिली धाव काढली.
तब्बल 39 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव काढल्याने स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या. स्मिथनेही हात उंचावत त्यांच्या प्रोत्साहनाचा स्विकार केला. तसेच वॅगनरनेही स्मिथच्या पाठिवर गमतीने थोपटले. विशेष म्हणजे वॅगनरने या मालिकेत स्मिथला 4 वेळा बाद केले आहे.
Getting off the mark off your 39th ball? A sigh of relief for Steve Smith! #OhWhatAFeeling @toyota_aus | #AUSvNZ pic.twitter.com/U3t0oS6aTn
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2020
या सामन्यात ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 3 बाद 283 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्यूशानेने शतक केले असून तो पहिल्या दिवसाखेर 210 चेंडूत 130 धावांवर नाबाद आहे. हे लॅब्यूशानेचे मागील 5 सामन्यातील चौथे शतक आहे.
तसेच स्मिथनेही अर्धशतक पूर्ण केले आहे. स्मिथने 182 चेंडूत 63 धावा केल्या. पण त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने बाद केले. स्मिथ आणि लॅब्यूशानेमध्ये 156 धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी झाली.
इंग्लंडला मोठा धक्का, हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
वाचा????https://t.co/Zwyx4QQBaw????#म #मराठी #Cricket #SAvsENG @englandcricket— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020
महाराष्ट्र संघाची लाजीरवाणी कामगिरी, तब्बल ८ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद
वाचा????https://t.co/jnUmfOhi0O????#SERvMAH #RanjiTrophy #म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020