Loading...

विराट कोहलीचे अव्वल स्थान धोक्यात; स्टिव्ह स्मिथची क्रमवारीत मोठी झेप

रविवारी(18 ऑगस्ट) श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यांनंतर आयसीसीने सोमवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

या क्रमवारी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मागे टाकले आहे. तसेच स्मिथ आता अव्वल क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीपेक्षा केवळ 9 गुणांनी मागे आहे. स्मिथचे 913 गुण झाले असून विराटचे 922 गुण आहेत.

स्मिथने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने पहिल्या ऍशेस सामन्यात दोन शतकी खेळी केल्या होत्या. त्यामुळे त्याने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

तसेच फलंदाजी क्रमवारीत मार्नस लॅब्यूशाने 82 वे आणि ट्रेविस हेडने 18 वे स्थान मिळवले आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने या सामन्यातील दुसऱ्या डावात केलेल्या 115 धावांच्या शतकी खेळीमुळे 6 स्थानांची झेप घेत 26 वे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने 7 स्थानांची प्रगती केली असून तो 30 व्या क्रमांकावर आला आहे.

Loading...

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.

या सामन्यातून इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलेल्या जोफ्रा आर्चरचा कसोटी क्रमवारीत समावेश झाला असून तो आता गोलंदाजी क्रमवारीत 83 व्या क्रमांकावर आहे. तसेच जॅक लीचने 8 स्थानांची प्रगती केली असून त्याने 40 वे स्थान मिळवले आहे.

Loading...

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या 122 धावांच्या शतकी खेळीमुळे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 8 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच या सामन्यात 6 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयाने गोलंदाजी क्रमवारीत 9 स्थानांची प्रगती करत 36 वे स्थान मिळवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटी संघाचा भाग नसतानाही नवदीप सैनी या कारणामुळे असणार टीम इंडियाबरोबर

धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही

तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या समावेशाबद्दल ही आहे मोठी बातमी

Loading...
You might also like
Loading...