संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ८ गड्यांनी पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय संघाची अंतिम फेरीत जाण्याची आशा अंधुक झाली आहे. सलग दोन पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत कसा जाईल याची समीकरणे आपण जाणून घेऊया.
पुढील सर्व सामन्यात विजय अनिवार्य
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ही भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्याची आशा आहे. भारताचे पुढील तीन सामने अफगाणिस्तान, नामिबिया व स्कॉटलंड यांच्याविरुद्ध होणार आहेत. या तिन्ही सामन्यात भारतीय संघाला मोठे विजय मिळवावे लागतील. हे तीन विजय मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या खात्यात ६ गुण जमा होतील. तसेच भारतीय संघाला आपला रनरेट देखील वाढवावा लागेल.
इतर निकालांवर असेल लक्ष
भारतीय संघाने या तीनही सामन्यात विजय मिळवला तरी इतर सामन्यांच्या निकालावर भारतीय संघाचे लक्ष असेल. ब गटातील अखेरचा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना जिंकणारा संघच उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता आहे. या सामन्यात अफगानिस्तानने विजय मिळवला तर, भारतीय संघाची आशा काहीशी उंचावू शकते. मात्र, अफगाणिस्तानचा रनरेट हा गटामध्ये सर्वाधिक असल्याने भारतीय संघ पिछाडीवर पडू शकतो.
रनरेटवर असेल लक्ष
भारतीय संघाला उपांत्य फेरीत जायचे असेल तर रनरेट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला असून त्यांचे उर्वरित दोन सामने पात्रता फेरीतून पुढे आलेल्या संघांविरुद्ध असतील. त्यामुळे, ते या गटातून अव्वल राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसऱ्या स्थानासाठी सर्व निकाल भारताच्या अनुकूल राहिले तरी, रनरेटवर भारताच्या विरोधात जाऊ शकतो. कारण, सध्या अफगाणिस्तानचा रनरेट सर्वोत्तम असला तरी, भारतीय संघाने उर्वरित तिन्ही सामन्यात मोठे विजय साजरा केल्यास व अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या चक्रव्यूहात अडकला भारत; दारुण पराभवानंतर कोहली म्हणाला, ‘ आता जोखीम घ्यावी लागेल’
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
जखमेवर मीठ! मोठ्या फटक्याच्या नादात कोहली झेलबाद, कॅच टिपल्यानंतर बोल्टने ‘अशी’ उडवली खिल्ली