fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे ज्यांचा खेळ पहायला मैदानावर जात असे असा क्रिकेटर

September 1, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray

Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray


१९५० च्या दशकातील मुंबईतील शिवाजी पार्कवर बापू नाडकर्णी, मधुसूदन पाटील, रमाकांत देसाई यासारखे मुंबई क्रिकेटमधील दिग्गज सामने खेळत अथवा सराव करत. तेव्हा एक तरुण दुसऱ्या तरुण खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी नेहमी शिवाजी पार्कवर येत. तो क्रिकेटचा चाहता तरुण होता बाळ ठाकरे, जो पुढे जाऊन भारताच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे या नावाने अजरामर झाला अन् तो खेळाडू तरुण सुद्धा भारतीय क्रिकेट जगतात तितकाच आदरार्थी व्यक्तिमत्त्व बनला. ते आदरार्थी क्रिकेटपटू म्हणजे मुंबई व भारताचे यष्टिरक्षक फलंदाज माधव मंत्री. आज मंत्री यांचा जन्मदिवस.

मंत्री एक यष्टीरक्षक व सलामीवीर फलंदाज होते. मुंबई क्रिकेट वर्तुळात नाव कमावल्यानंतर १९४८-४९ रणजी ट्रॉफीमध्ये त्यांची फलंदाजी नव्या उंचीवर पोहोचली. सलग तीन सामन्यात त्यांनी बंगालविरुद्ध ईडन गार्डन्सवर ११७, चेपॉक येथे मद्रास विरुद्ध (उपांत्यपूर्व फेरीत) ११६, तर पुणे येथे (उपांत्य फेरीत) महाराष्ट्राविरुद्ध २०० धावा केल्या. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील अंतिम सामन्यात ते ७० आणि ३० धावा करू शकले. त्या रणजी हंगामात मुंबईने विजेतेपद पटकावले.

१९५२ चा इंग्लंड दौऱ्यावर भारताला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी, डॉन ब्रॅडमन यांना अनेकदा चकवणारे डग राईट गोलंदाजी करत होते. तेव्हा मंत्री यांनी राइट यांना पुढे सरसावत षटकार ठोकला. तो षटकार प्रेक्षकांत गेला. त्यांनी मारला षटकार ब्रिटनच्या आयुक्तांनी झेलला होता.

माजी भारतीय खेळाडू विनू मंकड यांनी मंत्री यांचे टोपणनाव “जॉर्ज” असे ठेवले होते. इंग्लंडचे महान यष्टीरक्षक जॉर्ज डकवर्थ यांच्यासारखे यष्टीरक्षण मंत्री करतात असे मंकड यांना वाटत.

१९५४-५५ मध्ये पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या पहिल्या कसोटीत त्यांनी पंचांना टोमणे मारल्याची घटना क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहे. भारताचे दिग्गज फिरकीपटू सुभाष गुप्ते हे गोलंदाजी करत असताना पंच असलेल्या इद्रीस बेग यांनी एक नोबॉल दिला होता. तेव्हा, मंत्री बेग यांच्या जवळ जाऊन म्हटले, ” तुम्हाला कदाचित विस्डेनमध्ये नाव नोंदवून घ्यायचे आहे वाटतं. सुभाष कधीही नोबॉल टाकत नाही. ”

यष्ट्यांच्या दोन्ही बाजूंना मंत्री यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. ३३.८६ च्या सरासरीने ४,४०३ प्रथमश्रेणी धावा करताना, यष्टीरक्षक म्हणून १९२ गडी त्यांनी बाद केले. दुर्दैवाने, प्रबीर सेन आणि नरेन ताम्हाणे यांच्या आव्हानामुळे मंत्री केवळ चार आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळू शकले.

मंत्री हे सुनील गावसकर यांचे मामा तर गुंडाप्पा विश्वनाथ यांचे नात्याने काका लागत. सुनील गावसकर आपल्या ‘सनी डेज’ या पुस्तकात लिहितात, ” एकदा लहान असताना मी मामांकडे गेलो होतो. मामा त्यावेळी नुकतेच क्रिकेटपासून खेळाडू म्हणून बाजूला झाले होते. त्या ठिकाणी त्यांची मुंबई संघासाठीची तसेच भारतीय संघाकडून खेळलेली टोपी होती. मी त्यांना ती टोपी हवी आहे असे म्हटले. तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार देत सांगितले, सुनील या टोप्या भेट दिल्या जात नाहीत, तर कमवायच्या असतात.”

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मंत्री दादर क्रिकेट युनियनचे काम पाहू लागले. दिलीप वेंगसरकर व संजय मांजरेकर यांसारख्या खेळाडूंना शोधण्याचे श्रेय मंत्री यांना जाते. १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावेळी ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. या दौर्‍यात सचिन तेंडुलकरला त्यांनी अधिक संधी दिली होती. याव्यतिरिक्त ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष तसेच बीसीसीआयचे खजिनदार राहिले.

२०१४ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा ते ९२ वर्ष २६४ दिवसांचे होते. मृत्यूवेळी ते भारताचे सर्वात वयस्कर हयात असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले होते.

ट्रेंडिंग लेख –

एक नाही दोन नाही आख्खा संघच ठरला होता मॅन ऑफ द मॅच, पण कसे ते घ्या जाणून

भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

महत्त्वाच्या बातम्या – 

अखेर दुबईहून परतलेल्या व प्रचंड संकटात सापडलेल्या रैनाला घ्यावी लागली पोलीसांची मदत

मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच…

डिप्रेशनमुळे १२ महिने क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटरने केले जबरदस्त फटकेबाजी


Previous Post

धक्कादायक! सुरेश रैनानंतर हा दिग्गज खेळाडू सोडणार चेन्नई सुपर किंग्जची साथ?

Next Post

सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर गेला तरी चेन्नई सुपर किंग्सवर परिणाम होणार नाही, पहा कोण म्हणतंय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना

January 26, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर गेला तरी चेन्नई सुपर किंग्सवर परिणाम होणार नाही, पहा कोण म्हणतंय

Screengrab: Twitter/RCBTweets

'मिस्टर ३६०' एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी 'या' ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.