भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर मयंती लँगर हीने गेल्या काही वर्षात समलोचन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र, युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत आणि नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत तिने आपली उपस्थिती दर्शवली नव्हती. त्यामुळे चाहते निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. तसेच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
तिने आपल्या ट्विटर हँडेलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या चिमुकल्याला घेऊन पोज देताना दिसून येत आहे. तसेच या फोटोवर कॅप्शन म्हणून तिने “९ महिने पूर्ण झाले” असे लिहिले आहे.
मयंतीने आपल्या बोलण्याच्या स्टाईलने आणि खेळाबद्दल असलेल्या खोल माहितीमुळे चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने शेअर केलेला हा फोटो पाहून, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली देखील स्वत:ला आवरू शकला नाही. त्याने या फोटोवर ‘क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रेट ली आणि मयंती यांनी स्टार स्पोर्ट्सच्या अनेक कार्यक्रमात एकत्र काम केले आहे.
Cute 🙏🏻
— @BrettLee_58 (@BrettLee_58) May 8, 2021
मयंतीने गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या कामातून विश्रांती घेतली असून ती तिच्या ९ महिन्याच्या मुलाला वेळ देत आहे. त्याचमुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेसाठी ती उपस्थित नव्हती. तेव्हा तीने आपल्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर २०२१ आयपीएल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या समालोचकांच्या यादीतही तिचे नाव नव्हते. हे पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
परंतु, आता तिने पोस्ट शेअर करताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले की”तुम्ही या आयपीएल स्पर्धेत नव्हते म्हणून आयपीएल स्पर्धा पूर्ण होऊ शकली नाही.” तर आणखी एका युजरने लिहिले की,” वहिनी आम्ही टेलिव्हिजनवर तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. ज्युनियर बिन्नी क्यूट दिसत आहे.”
Bhabhi we are eagerly waiting for your come back on tv 📺 😍 by the way Junior binny looking cute
— ଈଶ୍ବର (ESWAR) (@Eswar560) May 8, 2021
https://twitter.com/dhruvthots/status/1390783191741472772
More than 2 years to watch u host cricket live. Come back mayanti 🤜🤛❤
— Nitesh Bhadoria (@BhadoriaNitesh) May 7, 2021
Mayanti is the best sports presenter. She has great sports knowledge especially cricket. I wish her all the best and hope to see her back at anchoring.. 🙏
— Nitin'Yahoo😀🇮🇱 (@nitinlem) May 7, 2021
We miss last two years in Star sports but congratulations you and your baby.
— Manish Kumar Jangir (@ManishNWH45) May 7, 2021
आयपीएल २०२१ ही स्पर्धा २९ सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड; त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक
भावा, हे घर आहे की हॉटेल? राशिद खानचे आलिशान घर पाहून सीएसकेच्या खेळाडूचे उडाले होश