सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ऍशेस मालिकेतील अखेरचा कसोटी सामना येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीनंतर इंग्लंडकडे 377 धावांची मोठी आघाडी असून, ते विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. असे असतानाच इंग्लंडचा दुसरा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तो या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल.
🚨 BREAKING: Veteran England pacer set to retire at the end ongoing #Ashes series!
More 👇https://t.co/eLSXQNijAb
— ICC (@ICC) July 29, 2023
(Stuart Broad announces he will retire from cricket at the end of the ongoing fifth Ashes Test against Australia)