Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी ठरला यशस्वी! रचली विक्रमांची मालिका, यादी पाहाच

यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी ठरला यशस्वी! रचली विक्रमांची मालिका, यादी पाहाच

July 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा
indveng

Photo Courtesy: Twitter/BCCI


याआधीचे भारताच्या दौऱ्यांचे निकाल पाहिले तर प्रथमच भारताचा यंदाचा इंग्लंड दौरा उत्तम ठरला आहे. सर्वात आधी तर भारताने इंग्लंडवर कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र शेवटचा पाचवा सामना गमावत मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली होती. नंतर झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत तर भारतानेच बाजी मारली आहे. भारताच्या गोलंदाजांनी तिन्ही वनडे आणि दोन टी२० सामन्यात इंग्लंड संघाला सर्वबाद करण्याची कामगिरी केली आहे. 

भारतीय संघाने टी२० मालिका २-१ आणि वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे. या मालिकांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रम रचले आहेत.त्यातील काही विक्रम पाहुया,

भाराताचा वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात केली आहे. त्याने ७.२ षटाकात १९ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ३ षटके त्याने निर्धाव टाकली.

‘द ओव्हल’ येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात बुमराहने १९ वर्षाचा विक्रम मोडला आहे. त्याने या सामन्यात ६ विकेट्स घेत आशीष नेहरा (Ashish Nehra) याचा विक्रम मोडला. नेहराने २००३च्या विश्वचषकामध्ये २३ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. आता १९ वर्षानंतर हा विक्रम बुमराहने मोडीत काढला आहे.

वनडेमध्ये भारताकडून गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. स्टुअर्ट बिन्नीने २०१४मध्ये बांगलादेश विरुद्ध मीरपूरच्या सामन्यात ४.४ षटकात ४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे तो अव्वल स्थानावर आहे. तर अनिल कुंबळे (Anil Kumble) हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी १९९३मध्ये कोलकातामध्ये झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात १२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंड दौऱ्याच्या पहिल्या वनडे सामन्यात बुमराहने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. तो एशियाबाहेर सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर कुलदीप यादवचा क्रमांक लागतो. त्याने इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात २५ दावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

मोहम्मद शमी हा वनडेमध्ये १५० विकेट्स घेणारा १३वा गोलंदाज ठरला आहे. भारताकडून वनडेमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज बनला आहे. त्याने हा विक्रम ८०व्या सामन्यात ७९व्या डावात नोंदवला आहे. आधी हा विक्रम अजित आगकरच्या नावावर होता. त्याने ९७व्या सामन्यात ही कामगिरी केली होती.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मॅनचेस्टरच्या सामन्यात केली आहेत. त्याने ७ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याआधी त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ३१ धावांवर ३ विकेट्स ही होती.

रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० मालिका जिंकली. यामुळे रोहित हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून लागोपाठ १३ टी२० सामने जिंकणारा पहिलाच कर्णधार ठरला. असा पराक्रम एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही करता आला नाही.

आंतरराष्ट्रीय टी२०चे अधिक सामने जिंकून देणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत धोनी ४१ विजयासह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कोहलीचा क्रमांक लागतो. त्याने ३० सामने जिंकून दिले आहेत. तर रोहितने ३१ सामन्यांपैकी २६ सामने जिंकून दिले आहेत. यामुळे त्याच्या विजयाची टक्केवारी ८३.८७ आहे.

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाजी रिषभ पंत (Rishabh Pant) भलताच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात कारकिर्दीतीतल पहिले शतक झळकावले आहे. त्याने २७व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

हार्दिक पंड्या एवढा उत्साहित आणि फिट कसकाय ? अष्टपैलूने स्वतः दिले स्पष्टीकरण

विराटच्या ‘बॅडपॅच’वर पाकिस्तानी दिग्गजाकडून सबुरीचा सल्ला; म्हणाला…

दिल्लीच्या पठ्ठ्यांनी महाराष्ट्राच्या गड्यावर केला शॅम्पेनचा वर्षांव, भारताचा विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल


Next Post
England ODI Team

ब्रेकिंग! इंग्लंडच्या कर्णधाराची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

MS-Dhoni-And-Rishabh-Pant

तिसऱ्या वनडेपूर्वी पंतला मिळालेला खास सल्ला, भारताचा माजी दिग्गजाचे ट्वीट व्हायरल

West-Indies-Team

दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143