दुस-या डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत या खेळाडूंनी पटकावले विजेतेपद

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजीत दुस-या डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सुहास कुलकर्णी, अनिल रसम, नितिन तोशनीवाल, मनिष रावत, सतिश कुलकर्णी, सुबोध देशपांडे, सारिका वरदे, अनघा जोशी व उज्वला मराठे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सांघिक गटात टी लॅक अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांनी विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 65 वर्षावरील पुरूषांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सुहास कुलकर्णीने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत पार्सी मेहताचा 11/7,12/10,11/9 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 60 वर्षावरील पुरूष गटात मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत अनिल रसमने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत प्रकाश केळकरचा 7/11,8/11,11/6,11/8,11/7 असा तर 50 वर्षावरील पुरूषांच्या गटात सोलापुरच्या अव्वल मानांकीत नितिन तोशनीवालने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत राम कदमचा 12/10,11/2,11/3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 40 वर्षावरील पुरूष गटात सोलापुरच्या अव्वल मानांकीत मनिष रावतने पुण्याच्या केदार मोघेचा 11/4,11/8,11/9 असा तर 70 वर्षावरील पुरूष गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सतिश कुलकर्णीने पुण्याच्या दुस-या मानांकीत दिलिप कुडतरकरचा 11/6,7/11,11/5,11/7 आणि 75 वर्षावरील पुरूष गटात पुण्याच्या सुबोध देशपांडेने नाशिकच्या अव्वल मानांकीत सतिश शिरसाटचा 11/3,11/1,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

40 वर्षावरील महिला गटात पुण्याच्या तिस-या मानांकीत सारिका वरदेने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सुषमा मोगरेचा 13/15,8/11,11/3,12/10,11/6 असा तर 50 वर्षावरील महिला गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत अनघा जोशीने मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत स्नेहा पाध्येचा 11/4,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 60 वर्षावरील महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत उज्वला मराठेने पुण्याच्या तिस-या मानांकीत सुहासीनी बकरेचा 11/7,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

सांघिक गटात 40 व 50 वर्षावरील गटात टी लॅक अकादमी संघाने पीटीकेएस अ संघाचा 3-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात ओंकार जोग, दिवेंदू सी व पंकज यांनी विजयी कामगिरी केली. 60वर्षावरील गटात पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने फोर्झा संघाचा 3-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात सुहास कुलकर्णी, प्रकाश केळकर यांनी एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटात चमकदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. सांघिक गटात विजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, डॉ विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ अरुंधती मुळ्ये, डॉ संजय मुळ्ये, पुणे जिल्हा टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, एमएसटीटीएचे सुहास दांडेकर, मानसी परळे, वसंत चिंचाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपेंद्र मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
उपांत्य फेरी- 65 वर्षावरील पुरूष
सुहास कुलकर्णी(1,मुंबई उपनगर) वि.वि उल्हास शिर्के(4,मुंबई उपनगर)11/7,11/4,11/3
पार्सी मेहता (3,मुंबई उपनगर) वि.वि जीतू मवानी (7,मुंबई उपनगर) 11/7,11/9,11/7

अंतिम फेरी- सुहास कुलकर्णी(1,मुंबई उपनगर) वि.वि पार्सी मेहता (3,मुंबई उपनगर) 11/7,12/10,11/9

उपांत्य फेरी- 60 वर्षावरील पुरूष
प्रकाश केळकर (1,मुंबई उपनगर) वि.वि जयंत कुलकर्णी (5,मुंबई उपनगर)8/11,12/10,11/5,11/7
अनिल रसम(2,मुंबई उपनगर) वि.वि रोहिदास गरुड(3, पुणे)12/10,7/11,11/4,11/9

अंतिम फेरी- अनिल रसम(2,मुंबई उपनगर) वि.वि प्रकाश केळकर (1,मुंबई उपनगर) 7/11,8/11,11/6,11/8,11/7

उपांत्य फेरी- 50 वर्षावरील पुरूष
नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि अजय कोठावले(4, पुणे)11/13,9/11,11/9,11/8,11/9
राम कदम(3,मुंबई उपनगर)वि.वि विवेक आलवणी(7, जळगाव) 11/8,4/11,9/11,11/5,11/6

अंतिम फेरी- नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि राम कदम(3,मुंबई उपनगर) 12/10,11/2,11/3

उपांत्य फेरी- 40 वर्षावरील पुरूष
मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि दिपेश अभ्यंकर(4, पुणे)11/5,11/6,8/11,11/8
केदार मोघे(15, पुणे) वि.वि पंकज रहाणे(3, नाशिक) 11/8,11/8,9/11,7/11,11/7

अंतिम फेरी- मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि केदार मोघे(15, पुणे) 11/4,11/8,11/9

उपांत्य फेरी- 70 वर्षावरील पुरूष
सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि कामेश भोंडे(पुणे)11/3,11/5,11/3
दिलिप कुडतरकर(2,पुणे)वि.वि रमेश थडानी(पुणे) 9/11,11/5,11/4,8/11,11/9

अंतिम फेरी – सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि दिलिप कुडतरकर(2,पुणे) 11/6,7/11,11/5,11/7

उपांत्य फेरी- 75 वर्षावरील पुरूष
सतिष शिरसाट(1, नाशिक) वि.वि विकास सातारकर(पुणे) 11/8,11/8,8/11,9/11,11/8
सुबोध देशपांडे(पुणे) वि.वि झरीर खंडादीया(मुंबई उपनगर) 11/9,11/9,4/11,14/12

अंतिम फेरी- सुबोध देशपांडे(पुणे) वि.वि सतिष शिरसाट(1, नाशिक) 11/3,11/1,11/4

उपांत्य फेरी- 40 वर्षावरील महिला
सुषमा मोगरे(1, ठाणे) वि.वि सिवाप्रिया नाईक (मुंबई उपनगर)11/6,11/6,11/7
सारिका वरदे(3, पुणे) वि.वि श्रावणी धप्रे(2, मुंबई उपनगर) 12/10,11/4,9/11,13/11

अंतिम फेरी- सारिका वरदे(3, पुणे) वि.वि सुषमा मोगरे(1, ठाणे) 13/15,8/11,11/3,12/10,11/6

उपांत्य फेरी- 50 वर्षावरील महिला
अनघा जोशी(1, अनघा जोशी) वि.वि चंद्रमा रामकुमार(पुणे) 11/6,7/11,11/8,8/11,11/8
स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर) वि.वि वैशाली मालवणकर(मुंबई उपनगर)13/11,11/9,9/11,14/16,11/7
अंतिम फेरी- अनघा जोशी(1, मुंबई उपनगर) वि.वि स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर) 11/4,11/2,11/4

उपांत्य फेरी- 60 वर्षावरील महिला
उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि मिना शहा(पुणे)11/4,12/10,11/9
सुहासीनी बकरे(3, पुणे)वि.वि रंजना पत्की(पुणे) 11/4,12/10,12/10
अंतिम फेरी- उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि सुहासीनी बकरे(3, पुणे) 11/7,11/2,11/4

सांघिक गट: 40 व 50 वर्षावरील गट:

अंतिम फेरी:
टी लॅक अकादमी वि.वि पीटीकेएस अ3-2(एकेरी- पंकज आर पराभुत वि सुहास 11-6, 11-8, 9-11, 6-11, 7-1; ओंकार जोग पराभूत वि समिर 6-11, 11-8, 3-11, 11-9, 5-11; ओंकार जोग वि.वि सुहास 1-8, 13-11, 11-1; दिवेंदू सी वि.वि रवी 11-7, 11-6, 11-6; दुहेरी- पंकज/दिवेंदू वि.वि समिर/रवी 11-6, 11-8, 11-4)

60वर्षावरील गट:
पीवायसी हिंदू जिमखाना अ वि.वि फोर्झा 3-1 (एकेरी- सुहास कुलकर्णी वि.वि पर्सी मेहता 11-2, 11-8, 13-15, 5-11, 12-10; प्रकाश केळकर वि.वि दिपक दुधाणे 11-8, 11-6, 11-9; प्रकाश केळकर वि.वि पर्सी मेहता 7-11, 12-10, 11-6, 6-11,11-6; दुहेरी- सुहास/ प्रकाश पराभूत वि जयंत/ पर्सी मेहता 7-11, 5-11, 11-9, 9-11 )

You might also like