---Advertisement---

इतिहास घडला! भारताच्या या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या!

---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील कूचबिहार ट्रॉफीमध्ये बिहार संघाचा युवा वेगवान गोलंदाज सुमन कुमारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीकरताना डावातील सर्व 10 बळी घेतले. बिहार आणि राजस्थानच्या संघांमधला सामना बिहारचे होम ग्राउंड मोईन उल हक स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यात सुमनने राजस्थान विरुद्ध पहिल्या डावात एकूण 20 षटके टाकली. ज्यात त्याने 53 धावा देत 10 विकेट्स घेतल्या.

बिहार संघाचा वेगवान गोलंदाज सुमन कुमारने 10 विकेट्स तर घेतल्याच शिवाय या दरम्यान त्याने हॅटट्रिकही केली. सुमनने राजस्थान संघाच्या पार्थ यादव, मनय कार्तिकेय, तोषित, मोहित भगतानी, अनस, सचिन शर्मा, आकाश मुंडेल, जतीन, आभाष श्रीमाळी, ध्रुव आणि गुलाब सिंग यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुमनच्या या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर बिहार संघाने राजस्थानचा पहिला डाव अवघ्या 182 धावांवर आटोपला. या सामन्यात बिहार संघाने पहिल्या डावात 467 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सुमनने फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 56 चेंडूत 22 धावांची खेळी खेळली. ज्यात त्याने चार चौकारही मारले.

राजस्थानविरुद्धच्या कूचबिहार ट्रॉफी सामन्यात सुमन कुमारने सलग तीन चेंडूत मोहित भगतानी, अनस आणि त्यानंतर सचिन यांची विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. या वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाच्या अंशुल कंबोजने केरळविरुद्धच्या सामन्यात आपल्या डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा-

रोहित शर्माच्या मुलाचे नाव समोर, पत्नी रितिका सजदेहने शेअर केला खास फोटो
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सलामी करणार नाही! ॲडलेड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय?
मार्को जॅन्सनने 11 विकेट्स घेत रचला इतिहास, भारतीय गोलंदाजाचा 28 वर्ष जुना विक्रम मोडित!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---