भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल सध्या संघासाठी जबरदस्त प्रदर्शन करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गिलने द्विशतक ठोकले. या सामन्यात गिलने 19 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 149 चेंडूत 208 धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर गिल वनडे द्विशतक करणारा जगातील सर्वात कमी वयाचा फलंदाज बनला. या वादळी खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर देखील या यादीत जोडले गेले आहेत. गावसकरांनी भारताच्या या युवा फलंदाजाला एक टोपण नाव दिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील शुबमन गिल (Shubman Gill) संघासाठी महत्वाचे प्रदर्शन करू शकला आणि विजयात त्याची भूमिका प्रमुख राहिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी (21 जानेवारी) रायपूरमध्ये खेळला गेला. भारताने हा सामना 8 विकेट्सने नावावर केला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यानंतर गिलने दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्याशी चर्चा केली. यावेळी गावसकरांनी गिलला नवीन टोपण नाव ठेवले. गावसकर म्हणाले, “मी तुला नवीन टोपण नाव ठेवले आहे. स्मूथमॅन गिल (Smoothman Gill). मला अपेक्षा आहे की तुला वाईट वाटले नसेल.” यावर बोलताना गिल म्हणाला, “मला काही अडचण नाहीये सर.”
रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याचा विचार केला, खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल दिसली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला न्यूझीलंड संघ अवघ्या 108 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तारत रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 20.1 षटकात अवघ्या दोन विकेट्स गमावत विजय मिळवला. मालिकेतील हा क्षारताचा दुसरा विजय ठरला असून मालिका देखील नावावर केली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (24 जानेवारी) इंदोरमध्ये खेळला जाईल. (Sunil Gavaskar gave Shubman Gill a new nickname)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी