भारतीय संघ शुक्रवारी बांगलादेशविरुद्धचा सामना खेळणार होता. त्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सलामीवीर केएल राहुल याला फलंदाजीचे काही सल्ले देताना दिसला. विराट आणि राहुलचे सराव सत्रातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनीही विराट आणि राहुलच्या या फोटोंविषयी मत व्यक्त केले आहे. राहुल टी-20 विश्वचषकातील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये अपरशी ठरला आहे आणि पुढच्या सामन्यात त्याच्याकडून चाहत्यांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
केएल राहुल (KL Rahul) टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चार धावा करून बाद झाला. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध आणि तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुलने प्रत्येकी 9-9 धावांची खेळी केली. मागच्या मोठ्या काळापासून राहुल खराब फॉर्मचा सामना करत आहे. टी-20 विश्वचषकात त्याचे हे खराब प्रदर्शन भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. भारतीय संघाच्या बांगलादेशविरुद्दच्या सामन्याआधी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) राहुलच्या या फॉर्मविषयी बोलत होते.
गावसकरांच्या मते विराट कोहली (Virat Kohli) शक्यतो राहुलला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू व्यवस्थित खेळण्यासाठी सल्ला देत असावा. माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले की, “विराट कोहली एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. हे विराटचे आवडते मैदान आहे आणि काय केले पाहिजे, हे तो राहुलला सांगू शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सुरुवातीला कोणत्याही फलंदाजाला त्रास देतो, हेच विराट त्याला सांगत असेल. तेव्हा तुम्हाला अंदाजा नसतो की, चेंडू किती मुव्ह करत आहे. राहुलने अशाच पद्धतीने विकेट गमावली आहे. तुम्ही त्या चेंडूंला खेळण्याचा प्रयत्न करता, जो सामान्यतः सोडला जातो. पण या फॉरमॅटमध्ये तुम्ही जास्त चेंडूंना सोडू देखील शकत नाहीत. त्याने हे चेंडू खेळण्याच्या नादातच विकेट गमावल्या आहेत. पर्थवर चेंडू जास्त बाउंस झाल्यामुळे तो बाद झाला, पण आपण विसरून चारणार नाही की, तो एक चांगला फलंदाज आहे.”
गावसकरांच्या मते राहुलमध्ये खूप गुणवत्ता आहे, पण अनेकदा त्याला स्वतःला या गोष्टीचा विसर पडतो. “प्रत्येक वेळी जेव्हा मी पाहतो की, राहुल धावा करत नाहीये. त्यावेळी मला वाटते त्याला स्वतःच्या क्षमता नाहीत नाहीयेत. असे वाटते की, त्याला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नाहीये. तो कमालीचा खेळाडू आहे आणि त्याला त्याच्याकडे कूप गुणवत्ता आहे. त्याने स्वतःला सांगितले पाहिजे की, मी मैदानात जाईल आणि दमदार खेळी करेल. अशा प्रकार खेळण्याची त्याला गरज आहे. फलंदाजी करकताना त्याला अभिमान वाटला पाहिजे. या गोष्टीमुळे खरोखर खूप फरक पडू शकतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाज पाहून चाहत्यांचीही वाढली चिंता
अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा