भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचे देखील महत्त्वाचे योगदान राहिले. सातत्यपूर्ण कामगिरी करत सिराज भारतीय संघात आपली जागा पक्की करत आहे. त्यामुळे आता भारताचे माजी कर्णधार व समालोचक सुनील गावसकर हे देखील स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकले नाहीत.
जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत सिराज वनडे क्रिकेटमध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने त्याची प्रचिती सर्वांना दिली. 350 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचे चार महत्त्वाचे फलंदाज त्याने माघारी धाडले. विशेष म्हणजे हे त्याचे घरचे मैदान होते.
त्याच्या या कामगिरीनंतर बोलताना सुनील गावसकर म्हणाले,
“सध्या मोहम्मद सिराज भारतीय संघासाठी प्रत्येक वेळी अप्रतिम कामगिरी करून दाखवतोय. नव्या चेंडूने तो अतिशय डोके लढवून गोलंदाजी करतोय. मधल्या षटकांमध्ये देखील त्याची गोलंदाजी वाखाणण्यासारखी आहे. तर, डेथ ओव्हर्समध्ये त्याला बळी मिळवण्यात यश येतेय.”
नुकत्याच झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत सिराज याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालिकेतील तीनही सामन्यात मिळून त्याने नऊ बळी मिळवलेले. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केलेली. याच कामगिरीमुळे त्याने वनडे गोलंदाजी क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात देखील त्याने अशीच कामगिरी केल्यास तो या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचू शकतो.
(Sunil Gavaskar Praised Mohammad Siraj For His Bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कुस्तीत खळबळ! महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, आंदोलनाला सुरुवात
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार